
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
बॅकेत सुशोभीकरण करून पताके वगेरे लावली ग्राहकांना मिठाई चे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र ग्रामीण बॅक च्या कार्यश्रेत्रातील आदीवासी, नक्षलप्रनव भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माजरी माथा येथे बुधवारी शाळेतील आदिवासी मुला, मुलींना शालेय शैक्षणिक उपयोगी साहीत्य शाखा
व्यवस्थापक राहुल बेंदुले, सहाय्यक व्यवस्थापक शुभम रामटेके, सहकारी उत्तम गायकवाड, गौतम कांबळे, महाराष्ट्र ग्रामीण बॅक चे बि. सी. गणेश जयस्वाल, अविनाश कावळे याच्या हस्ते पहिले ते चवतीतील प्रत्येक विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तर अतिदुर्गम भागात भेट दिल्याबद्दल मुख्याध्यापक बालाजी शिंदे यांनी शाखाव्यवस्थाक राहुल बेंदुले, सहायक व्यवस्थापक शुभम रामटेके, उत्तम गायकवाड, बी. सी. गणेश जयस्वाल, कावळे, यु. टुब, नाइनचे गौतम कांबळे यांचा सत्कार केला. यावेळी सहशिक्षक शंकर दामले, गावातील प्रतिष्ठित नागरीक,महिला, उपस्थित होते.