
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
कैलासवासी बाबुराव सुतार (बापू) यांच्या १९ व्या पुण्यस्मरणा निमित्त गायनाचार्य ह भ प श्रीराम महाराज अभंग यांची कीर्तन सेवा संपन्न……
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील प्रगतशील बागायतदार व पंच क्रोशीतील आधारस्तंभ प्रसिद्धी व्यक्ती महत्त्व आसणारे कैलासवासी ह ब प बाबुराव सुतार यांच्या 19 (एकोणिसाव्या) पुण्यस्मरणाचे औचित्य साधून पैलवान चंद्रकांत सुतार सह सर्व परिवार यांच्या वतीने महाप्रसाद व कीर्तन सेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ह भ प श्रीराम आभंग महाराज यांनी बापूंच्या कार्याला उजाळा देताना सांगितले की आष्टपुत्र परिवार व दोन मुली आसा मोठा परिवार त्यांचा आहे. या सर्वांचा धार्मिक क्षेत्रात नेहमीच सिंहाचा वाटा आसतो. पुण्यस्मरणा निमित्त किर्तन रुपी सेवेसाठी उपस्थित भाविक भक्त पिंपरी बुद्रुक, सुरवड, ओझरे, गोंदी,सराटी, संगम, गिरवी, टणु , गणेशवाडी, गारअकोले, माळीनगर, आकलूज, शिंदेवस्ती, यथील परिसरातील विणेकरी व टाळकरी आणि भावी भक्त बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच उत्कृष्ट मृदंग वादन सेवा ह भ प शुभम महाराज वायकुळे सुरवड यांनी केली. कार्यक्रमाचे आयोजन सुतार वस्ती येथील पैलवान चंद्रकांत बाबुराव सुतार यांच्या निवासस्थानी केलेले होते. गेली 19 वर्षे अखंडपणे पुण्यस्मरण सोहळा सुतार परिवाराच्या वतीने आयोजित केला जातो व सर्वजण त्यामध्ये सहभागी होऊन
कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद घेऊन करण्यात आली.