दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर,
राजाराम भाऊ भालेकर यांची कन्या भारती ताई या जून मध्ये झालेल्या कोण बनेगा मराठी करोडपती साठी निवड झाली होती. १६ व १७ जुन ला हा कार्यक्रम दाखवण्यात आला आहे.सोनी मराठी या चैनल कोण बनेगा मराठी पर्व 3 त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर पन्हाळा तालुक्यातील व पन्हाळा गावातील पहिल्या सुकन्या गावातील लेक म्हणून मान मिळवला आहे. सध्या ते बदलापूर येथे राहत आहेत.
भारती ताई यांचे शिक्षण पन्हाळा इथेच दहावीपर्यंत झाले आहे .त्यांना पन्हाळा विद्यामंदिर पन्हाळा १९८३ त्यांची बॅच होती. त्या बॅचमध्ये अविनाश पाध्ये,रेखा महाजन ,भारती भालेकर, यांच्यात शाळेमध्ये नंबर काढण्यासाठी एक प्रकारची रस्सीखेच असायची इथल्या शिक्षकांचे लहानपणापासून चांगले संस्कार घडवलेले आहेत. त्यावेळचे शिक्षक, एम, जे, कुराडे ,सर धर्माधिकारी सर ,स्टॅन्ड वर गणिता च्या क्लाससाठी दिलीप जोशी, सरांकडे जात असत. त्यांचा बोर्ड लावून गावात चौथी, सातवी, ला स्कॉलरशिप मध्ये नंबर आल्यामुळे फार कौतुक गावातून झाले होते. तसेच गावातून हिडनी, फिरणे , मजा करणे ही गावातली त्यांची फारच आवडती सवय होती, त्यांना फार छान वाटतं होते. त्यांना आत्ताही आठवते. तसेच त्यानंतर त्यांचे पुढचे शिक्षण न्यू कॉलेज कोल्हापूर येथे झाले आहे. त्यानी बी -कॉम मधून आपली पदवी घेतली आहे. त्यांचं तसं अकॅडमीक चांगले होते.परंतु लग्न झाल्यानंतर त्या खास गृहिणी म्हणूनच काम करत असत तसेच त्यांचे पती कडेगाव गडिंग्लज इथले पहिले गावातले इंजिनिअर होते. ते मुंबई बेस्ट मध्ये कामाला होते. चांगल्या ऑफिसर पोस्टवर त्यांची नोकरी होती. त्यांच्याबरोबरच मुंबईला कॉटर्समध्ये राहत असत.५४ वयाच्या सर्वात सीनियर महिला कोण बनेगा करोडपती खेळणाऱ्या महिला ठरल्या आहेत.
मुलाखत घेत असताना भारतीताई अशा म्हणाल्या की,ते गेले वीस ते बावीस वर्षांपासून करोडपती साठी प्रयत्न करत होत्या. आता त्यांना यात यश मिळाले आहे.करोडपती पाहत असताना जे प्रश्न पडत होते, ते मी उत्तर देत बसत यातूनच ज्ञान वाढत गेले. तसेच अवांतर लिखाण वाचण्याची सवय लहानपणापासूनच आहे, मी फार जनरल नॉलेज चा अभ्यास साठी पुस्तके वाचत होते.तसेच रोज पेपर वाचणे असा माझा रोजचा दिनक्रम असायचा या कार्यक्रमासाठी रजिस्टर फेब्रुवारीपासून सुरू होते ६ टप्प्यांमध्ये हे या कार्यक्रमाच्या पात्रसाठी प्रोसिजर चालू होती. त्याच्या आधी त्या २००० सालापासून लँडलाईन वर फोन करून प्रयत्न करत असत. तसेच आता महाराष्ट्रातून सहा लाख लोकांनी यामध्ये नोंदी केल्या होत्या त्यामधून त्यांचे सिलेक्शन झाले.हे एक नशिबाचा भाग आहे. असे त्यांना वाटते मग फिंगर फास्टर साठी निवडक झाली सुदेवाने त्यांना माहित होते तेच प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेले. त्यामुळे त्या ठाम होत्या ज्यावेळी पन्नास लाख चा त्यांना प्रश्न आला त्यावेळी त्यांच्या त्यावेळी लाईफ लाईन पण होती.व्हिडिओ फोन त्यांनी त्यांच्या मुलग्याला फोन लावून विचारले होतेbत्यांनी दिले होते.ते योग्य उत्तर दिले होते. तो पण ठाम नव्हता परंतु त्यावरती ठाम नसल्यामुळे त्यांनी. ते गेम सोडण्याचा विचार केला आणि तो योग्यच निर्णय होता. अशा त्या म्हणाल्या
त्या एकदम सामान्य कुटुंबातून आले आहेत.त्यामुळे त्यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. ती पुढेही सामान्य जीवन जगणार आहे. त्यांच्या माहेरचे गाव पन्हाळ्यातील माझ्या कुटुंबाचा मला अभिमान वाटतो .जी पैसे मिळवले ते मी जपून काळजी पूर्वक योग्य पद्धतीने वापर करीन संपूर्ण श्रेय माझ्या पतीला मी देते असेही ते म्हणाल्या जे लोक करोडपतीच्या साठी प्रयत्न करत आहेत त्यांनी प्रयत्न सोडू नये.प्रयत्न पुढे चालूच ठेवावेत असाही त्यांनी सल्ला दिला आहे. मी तर बावीस वर्षे प्रयत्न करते आणि मला आज यश मिळाले आहे. ही माझी पहिली कमाई आहे .मी तर एक गृहिणी आहे. तसे मला शाळेमध्ये स्कॉलरशिप मिळाली होती. गणितातील नंबर आल्यामुळे बक्षीस सुद्धा मला मिळाले होते परंतु एवढी मोठी कमाई ही माझी कष्टाची ही पहिलीच म्हणायची वेळ आहे. फक्त नवऱ्याची आठवण येते व त्यानाच फक्त विश्वास होता. याची इच्छा होती की, मी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा त्यांची आता ही इच्छा पूर्ण झाली. त्यांचे पतीचे निधन होऊन दहा वर्षे झाली. त्याच्या पत्नी २०१२ ला निधन झाले आहे. परंतु त्यांना असे वाटते की, नेहमी ते त्यांच्यासोबत असतात. त्यांनी दहा वर्ष चांगल्या प्रकारे संसार केला आहे, त्यांना एक मुलगी व एक मुलगा आहे मुलगी आयटी इंजिनियर आहे व त्याचे लग्न सुद्धा झाले आहे.मुलगा पुण्यात अजून शिकत आहे तो एम टेक करत आहे. सध्या त्या बदलापूर या ठिकाणी राहत आहे.
पन्हाळा विद्यामंदिर पन्हाळ्याचे घुगरे सर, भारतीताई बद्दल विचारले असता त्यांनी असे सांगितले की,अत्यंत हुशार अशी मुलगी होती . आज्ञाधारक विद्यार्थिनी पहिल्या तीन नंबरात ती शाळेत येत होती.त्याला पहिल्यापासूनच वाचायची अभ्यास करायची आवड फार होती. ते मनापासून पूर्ण करून घरातला अभ्यास येत असत. मी त्यावेळी त्यांना विज्ञान ,गणित, हे विषय शिकवत होतो. त्या काळातली अशा प्रकारची विद्यार्थी भेटणे हे शिक्षकांचे भाग्यच होते आता असे विद्यार्थी शिक्षकांना भेटू शकत नाहीत परिस्थिती फार बदललेली आहे. तसेच आज माझ्या विद्यार्थिनीला कोण बनेगा करोडपती मध्ये पाहून मला आनंद झाले आहे.
त्यांचे भाऊ संजीव भालेकर यानी अशी माहिती दिली की,आम्ही तीन भावंडे.भारती मधली.आमचे बालपण आनंदात मजेत सरले..तिला लहानपणापासून वाचनाची आवड होती.. रोजचे वर्तमानपत्र शिवाय मोरोपंत ग्रंथालयातील पुस्तके तिची वाचनाची आवड पुरवत होते. ती पोहायला शिकली आहे.शाळेतून व्हॉलीबॉल चे प्रशिक्षणही तिने घेतले आहे. तिचे हस्ताक्षर आणि चित्रकला खूप छान आहे.सगळे करून बघायची उत्सुकता तिच्यात कायम दिसते.पुढच्या आयुष्यातही ती अशीच राहिली.. तिची वाचनाची आवडच तिला कोण होणार करोडपती साठी खूप उपयोगी ठरली..
