दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: देगलूर बिलोली तालुक्यामध्ये सात दिवसापासून सूर्याचे आगमन न होता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्वरीत शेतीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावे असे निवेदन देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी मंत्रालय गाठून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अतिवृष्टीचे निवेदन दिले आहे.
सविस्तर माहिती अशी की, मागील सात दिवसापासून सततच्या पावसामुळे नदी नाले तुडूंब भरली असून आजूबाजूच्या रस्त्यावरील पुले सुद्धा वाहून गेले असल्यामुळे या भागातील बऱ्याच गावाचे संपर्क तुटल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन,कापूस,उस,हळद पिक पूर्ण खरडून वाहून गेले असल्यामुळे अतोनात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याचे आदेश देण्यात यावे असे निवेदन देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देऊन सहकार्य करावे असेही सांगितले त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निश्चित यावर विचार केला जाईल असे शब्द आमदार जितेश अंतापुरकर याना दिले.
