दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी-किशोर वाकोडे
नांदुरा: दि.२२. शिक्षणाचे आकर्षण वाढले.पण सरकारमधे चोर शिरल्याने सरकारी शाळांवरील नियंत्रण राहिले नाही.म्हणून खाजगी शिक्षण संस्था मैदानात उतरल्या.खाजगी शाळांचे व्यवस्थापन चांगले असल्याने पालकांनी तिकडे धाव घेतली.अतिरीक्त फी, डोनेशन वगैरे देऊन मुले खाजगी शाळेत घातली.मुलांना खाजगी शाळेत प्रवेश घेतांना पालक कोणतीही अट मान्य करतात.मागितले तितके पैसे फी व डोनेशन म्हणून मोजतात.अगदी अंधारात, कोपऱ्यात.ते ही चेयरमन किंवा एच.एम.ला न देता शिपाई किंवा भलत्या सलत्या असंबद्ध माणसाच्या माध्यमातून देतात.यात पालक आणि संस्थाचालक यांचा आपसातील सौदा असतो.कधीकधी तर मध्यस्थ,एजंट सुद्धा मदत करतो.
खाजगी शाळेत प्रवेश देतांना संस्थाचालक मुलांसोबत पालकांचीही मुलाखत घेतात.नको तितके नाचवून घेतात.तेंव्हा पालक हूं कि चूं करीत नाहीत.कारण त्यांना त्यांचे पाल्य इतरांपेक्षा वरचढ शिकवायचा असतो.त्याला इंग्लंड अमेरिका पाठवायचा असतो.म्हणून ते सर्वच नको ते अत्याचार सहन करतात.तेथे त्यांचा स्वाभिमान दुखावला जात नाही.हेडसांड, अपमान ,माकड होत असले तरी आक्षेप घेत नाहीत.इतके अगतिक झालेले असतात कि कपडे उतरवून नाचायला लावले तरी पालक नाचतील.असे सर्व अपमान,शोषण सहन करून लग्न,मयत मधे वर मान करून सांगायला बरे,कि आमचा बंटी आणि बबली इंग्लीश मेडियम ला आहे.कॉन्व्हेंटला आहे.सेमी ला आहे.सी.बी.एस.सी. वगैरे काय काय बढाई मारतात.
काही पालक तक्रार करतात.काहो, आमच्याकडून डोनेशन घेतले.आणि पावती दिली नाही. पावती दिली तर त्यांच्यावर रजिस्ट्रेशन नंबर नाही. बिना रजिस्ट्रेशन नंबरची पावती तुम्ही का घेतली. ? डोनेशन फी किती?पैसै तुम्ही गुपचूप देऊन येणार आणि पावती दुसरा कोणी आणून देणार का?पैसे दिले तर डोनेशन ची पावती घ्या.नसेल पावती देत तर नका देऊ डोनेशन?.
खाजगीकरणाच्या शाळेत शिकवणारे शिक्षक त्यांचे शिक्षण किती?. त्यांना अनुभव आहे का, याची कधी चौकशी केली का?. शिक्षीत आणि उच्चशिक्षित लोकांनी सरकारी शाळा नाकारून खाजगी शाळांकडे मुले घातली.तर आता मोल मजूरी करणारा सुद्धा द्विधा मनस्थितीत असून त्यांच्या मागे धावण्याचा प्रयत्न करत आहे.परवडत नसले तरी डोनेशन देत आहेत. शाळा लांब असली तर त्याचा प्रवास खर्च वेगळात्यांचा प्रवास खर्च वेगळा.पुस्तके, युनिफॉर्म चा खर्च वेगळा.
सरकार हेच खाजगीकरण करीत आहे.अशी बोंब मारणारी माणसे सूद्धा खाजगीकरण कडे वळत आहे.खाजगी शाळा हवी.खाजगी दवाखाना हवा.खाजगी बॅंक हवी.पतपेढी हवी.बुडाली ,बुडवली तरी चालेल.खाजगी वाहन हवे.तर मग सरकार सुद्धा तेच तर करीत आहे.सामान्य माणसांचा कल खाजगीकरणाकडे जास्त आहे.म्हणून सरकार सुद्धा सरकारी संस्था खाजगी उद्योपतींना विकून मोकळे होत आहे.यथा प्रजा तथा राजा.
पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला कापूस कृषी उत्पन्न बाजार समिती ला न विकता खाजगी व्यापारी ला विकला.त्या व्यापाऱ्यांनी माल घेतला,विकला आणि पैसे न देता पोबारा केला.भाजप सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती चे नियंत्रण उठवले.पंजाब, हरियाणा च्या शेतकऱ्यांना आवडले नाही.त्यांनी आंदोलन केले.प्राण गमावले. कायदे रद्द करवून घेतले.त्या उलट चा मार्ग पाचोरा किंवा अन्य ठिकाणाच्या शेतकऱ्यांनी अवलंबला.फसवणूक झाली.अशीच फसवणूक शिक्षणाबाबत पालक करून घेत आहेत.सरकारने सरकारी शाळा पुर्ण बंद केल्या तर मोफत शिक्षण बंद होईल. अनेक लोकप्रतिनिधीनी स्वताच्या खाजगी शाळा सुरू केल्या आहेत.सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.हे लोकप्रतिनिधी जनतेशी प्रामाणिक नाहीत.ते संधीसाधू आहेत.ज्या माणसाकडे एक जरी खाजगी संस्था असली तरी तो लोकप्रतिनिधी बनण्यास लायक नसतो.त्याचा कल सेवा ऐवजी मेवा कडे असतो.सरकारकमधून चोरी करणे आणि स्वताचे घबाड भरणे हाच त्याचा हेतु असतो.असे लोकप्रतिनिधी निवडून देताना जनतेने विचार करावा..?.
