दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
भाजपाचे ज्येष्ठ नेते राज्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने भाजपा युवा मोर्चाचे लोहा तालुका अध्यक्ष बंडू पाटील वडजे यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रणिताताई देवरे – चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी लोहा शहरात भाजपाचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हा बँकेचे संचालक प्रविण पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे लोहा तालुका अध्यक्ष बंडू पाटील वडजे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात . यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत भाजपा युवा मोर्चाचे तरुण तडफदार सक्रिय तालुका अध्यक्ष बंडू पाटील वडजे यांच्या वतीने जि.प. सदस्या प्रणिताताई देवरे – चिखलीकर यांच्या हस्ते लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सफरचंद,केळी, बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्या सौ. प्रणिताताई देवरे -चिखलीकर, माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, कार्यक्रमाचे संयोजक तथा भाजपा युवा मोर्चाचे लोहा तालुका अध्यक्ष बंडू पाटील वडजे , सामाजिक कार्यकर्ते विक्रम भाऊ शिनगारपुतळे ,वि.ह.प.चे तालुकाध्यक्ष अंबादास पाटील पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक मोटे ,१०८ चे सिध्दार्थ ससाणे, माजी नगरसेवक आप्पाराव पाटील पवार,शहाजी राठोड, माधव पाटील पवार, उपसरपंच कोंडीबा पाटील गायकवाड , अंबादास जहागिरदार,बाळू पाटील कदम, बाळू पाटील पवार,घनश्याम पवार, पिंटू पाटील पवार, मनोहर पाटील कदम, दत्ता पाटील शिंदे, सतीश पाटील वडजे, सुरेश पाटील वडजे, रामचले मामा , नारायण टिमकीकर,चंदू पाटील वडजे,चंदू कांबळे, यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
