दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
झाडे लावा झाडे जगवा , संदेश देत लोहा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने केला वर्धापनदिन साजरा
लोहा – ग्रामीण भागातील शेतकरी ,मजूर व महिलांचा विकास व्हावा , यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने ग्रामीण भागात बचत गट काढण्यात आले व त्यांचे आर्थिक सक्षमिकरण व्हावे,यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्यावतीने गाव पातळीवर अतिशय सुंदर उपक्रम हाती घेतले आहेत.
बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेत अनेकांनी आपली प्रगती साधली आहे.केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम बँकेच्यावतीने प्रभावीपणे होत आहे.याच बरोबर बँकेने सामाजिक दायित्व जपत विविध उपक्रमातून योगदान देत आहेत.लोहा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने संत गाडगे महाराज विद्यालयाच्या प्रांगणात वर्धापन दिनानिमित्त शाळेत वृक्षारोपण करुन वृक्षाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याचे काम केले आहे.त्याचबरोबर आजच्या आधुनिक युगात डिजिटल साक्षरता महत्वाची असल्याने त्याबाबत जागृती करण्यात आल्याने नागरिकांना डिजिटल बँकिंग सेवेचा लाभ कसा घेता येईल या विषयी मार्गदर्शन केले आहे.अशा उपक्रमांसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक पुढाकार घेत राहिल, असे शाखा व्यवस्थापक व्हि.जी कऱ्हाळे यांनी केले.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त लोहा शाखेच्यावतीने श्री संत गाडगे महाराज विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य अशोक गवते , रावणगावे , मुरटकर , भंडारे सर आदिंची उपस्थित होती. तर लोहा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनीजर व्हि.जी कऱ्हाळे , ऑफिसर आदित्यकुमार , ऑफीसर सुप्रिया सुर्यवंशी , कॅशीअर अखिलेश कुमार , महाराष्ट्र ग्रामीण शाखेचे सेवक नारायण पोलकमवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
