दैनिक चालू वार्ताप्रतिनिधी- संभाजी गोसावी
कराड तालुक्यांतील चिखली या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून गोसावी समाज बांधवांसाठी हक्काची दफन विधीसाठी जागा मिळण्याबाबत आज रोजी सातारा उपजिल्हाधिकारी मान्यनीय. प्रशांत आवटी साहेबांना गोसावी समाज बांधवाकडूंन निवेदनद्वारे विनंती करण्यांत आली की.आम्हांला हक्काची व शासकीय जागा मिळण्याबाबत समक्ष निवेदन देण्यांत आले. याबाबत कराड तालुका दशनाम गोसावी समाजांचे संपर्क प्रमुख व माजी अध्यक्ष संजय गिरी या निवेदनांत म्हणाले की कराड तालुक्यांत चिखली हे गाव असून सदर या गावांमध्ये गोसावी समाजासाठी दफन विधीसाठी हक्कांची जागा नसल्या कारणांमुळे गोसावी समाजामध्ये एखादी व्यक्ती मयत झाल्यांस त्या कुटुंबातील व्यक्ती स्वतांच्या शेतामध्ये दपन विधी करतात तसेच मी वेळोवेळी शासनाकडे याबाबत प्रस्तावही दाखल केले होते. तसेच चिखली ग्रामपंचायत तिलाही याबाबत निवेदन देण्यांत आले होते. यावेळी आज रोजी कराड तहसिलदार विजय पवार यांच्यासह ग्रामपंचायत व माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मी स्वता मागणी केली आहे. तसेच याबाबत आज मी समक्ष सातारा उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटी साहेब यांना गोसावी समाजासाठी शासकीय दफन विधीसाठी त्वरित जागा मिळावी याकरिता मी माझ्या समाज बांधवांच्या उपस्थिंत समक्ष निवेदन देत आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटी साहेब यांनी हे निवेदन स्वीकारले यावेळी तुमच्या चिखली गावातील गोसावी समाजाच्या दफनविधीच्या जागेचा लवकरच प्रश्न सोडवू असे आपले मत उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी व्यक्त केले. यावेळी कराड तालुक्याचे संपर्कप्रमुख दशनाम गोसावी समाज माजी अध्यक्ष संजय गिरी, सातारा दशनाम गोसावी समाजांचे अध्यक्ष जगन्नाथ गिरीगोसावी, जुळेवाडीचे बांधव सिताराम गिरी, कोरेगांव तालुक्यांचे नूतन प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी आदीं दशनाम गोसावी समाज बांधव यावेळी उपस्थिंत होता.
