
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- मोर्शी-शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या दमयंती नदीवर सुमारे वीस वर्षापूर्वी पाईलीचा पुल बांधण्यात आला होता.सदर पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नदीला पूर मोठया प्रमाणात येतो;तर पेठपुऱ्याकडे जाणाऱ्या मार्गाचा संपर्क तुटून जातो.तसेच पूराची स्थिती वाढली तर नागरी वस्तीत पुराचे पाणी जावून अनेकांच्या घराचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते.याकडे शासनाने गांभीर्याने दखल घेऊन व शहरातील हा नागरिकांचा मुख्य प्रश्न निकाली काढावा.मोर्शी शहरातील दमयंती नदीवर मोठा पूल बांधण्यात यावा या मागणीसाठी बुधवार दिनांक २० जुलै २०२३ रोजी भारतीय जनता पार्टीचे रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वात तहसीलदार सागर ढवळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.