
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर.
नगरपरिषद च्या वार्षिक एकूण उत्पन्ना पैकी बांधिल खर्च वजा जाता राहिलेली निवड महसुला पिकी ५% रकमेतून राबवण्यात महिला बालकल्याणा साठी योजना या निधीतून पन्हाळा अंगणवाडी या शाळेसाठी शालेय साहित्य नगरपालिका कडून देण्यात आले. पन्हाळगडावर दोन अंगणवाड्या शाळा आहे. सध्या तरी दुर्लक्षित अशा झालेल्या आहेत पहिल्यांदाच त्यांना अशा प्रकारे शालेय साहित्य देऊन सहकार्य नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.हे आता दरवर्षी देण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. सध्या या अंगणवाडीत लाईट नाही आहे .पाणी नाही आहे. शौचालय सुद्धा नाही आहे. जे काय मटरेल आहे ते ठेवण्यासाठी त्यांच्याकडे कपाटे नाही आहेत.अशी अवस्था पन्हाळा वरच्या अंगणवाडीची आहे. या अंगणवाडीत शाळेत पन्हाळा शहरातीलच मुले शिकत आहेत.
महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक व नागरी अधिनियम १९६५ मधील शासनाच्या सुधारणा केली आहे. त्यामुळे अधिनियम कलम ६५ नुसार प्रत्येक नगरपालिकेत महिला व बालकल्याण समिती स्थापना करणे बंधनकारक असते. त्याच राखीव पाच टक्के हा निधीतून या अंगणवाडी शाळेला साहित्य नगरपरिषद मार्फत देण्यात आले आहे. तसेच तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प कोल्हापूर इचलकरंजी यांचे पन्हाळा मा, मुख्याधिकारी नगरपरिषद पन्हाळा यांना पत्र आले होते की,नगरपरिषदेच्या महिला व बालकल्यांसाठी राखीव पाच टक्के तरतुदी मधील अंगणवाडी साठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे बाबत. याचीच दखल घेत मा.मुख्याधिकारी व अमित माने,यांनी यांना शालेय उपयोगी असे साहित्य दिले आहे. जे मोठे साहित्य आहे ते त्यांना टेंडर काढून अंगणवाडी शाळेस देण्यात येणार आहे , तसेच इथून पुढे ज्या अंगणवाडीला गरजेचे आहे. ते आम्ही पन्हाळा नगरपरिषदेच्या वतीने देण्याचे प्रयत्न करू अशी माहिती नगरपरिषदेकडून मिळाली आहे. बाल विकास अधिकारी इचलकरंजी यांनी मागणी केली आहे, की, अंगणवाडीतील वीज, पाणी , शौचालय,इत्यादी सुविधा करण्यात यावा यासाठी अंगणवाडीस स्वतंत्रपणे वीज ,पाणी ,देत अंगणांतर्गत अखंड पुरवठा करता येईल. तसेच गरोदर महिला अंगणवाडी विद्यार्थी वैद्यकीय तपासणी करणे बाबत आरोग्य तपासणी करून उपचार शिबिर नगरपरिषद मार्फत भरवावे असेही पत्रात म्हटले आहे.
राजू नगारजी सामाजिक कार्यकर्ते, या अंगणवाडी बद्दल बोलताना माहिती दिली की, पन्हाळा गाव जरी नगरपालिका असली तरी एक खेडेगाव स्वरूपाचे गाव आहे .इथे सर्वसामान्य लोक राहतात आणि सर्वसामान्य लोक या अंगणवाडीतच आपल्या मुलांना शाळेत घालतात त्यामुळे या शाळेवर नगरपरिषद शासनाचे लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या तरी इथे लाईट नाही आहे .हा मोठा प्रश्न आहे .लहान मुलांना शिकवायचं तर कसं या अंगणवाडी सेविकानी लहान मुलांना शिकवतील काय अंधारात असा त्यांनी सवाल केला आहे. अंगणवाडी ही लहान मुलांची शाळेची पहिली पायरी असते. इथूनच मुलांची भविष्य घडणारी पायरी असते .त्यामुळे इथे चांगले शिक्षण व सुविधा मिळणे फार गरजेचे आहे.त्यांनी अशी मागणी केली आहे.की लवकरात लवकर या ठिकाणी लहान मुलांसाठी शौचालय ,विज, पाणी, याची सोय करावी.लहान मुलांना अंधारात बसावे लागत आहे याचं फार दुःख वाटत आहे.
अंगणवाडी सेविका सुषमा गवंडी व उषा कांबळे यांनी माहिती दिली की, हे अंगणवाडी ला पहिल्यांदाच अशा प्रकारे साहित्य मिळत आहे.असेच नगरपालिकेचे सहकार्य असावे. अशाच पद्धतीने गावातल्या तरुण मंडळांनी संस्थांनी यात लक्ष घालून निधी उपलब्ध करून जे लहान मुलांना खेळणी किंवा जे काही साहित्य लागते ते उपलब्ध करून द्यावे . कारण ही शाळा आपल्या गावातल्या मुलांसाठीच आहे . सामान्य कुटुंबातीलच मुले शाळेत शिकत असतात.