
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
🔸 उपाध्यक्ष पदी सौ. रेश्माताई प्रमोद सावरकर यांची निवड
🔸 जिल्हा महिला बँकेत सलग २६ वर्ष आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांचे वर्चस्व
——————————————-
अमरावती :- संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या व जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या दि.अमरावती जिल्हा महिला सहकारी बँकेवर सहकार नेत्या आ.सौ.सुलभाताई संजय खोडके यांच्या गटाने निर्विरोध वर्चस्व सिद्ध केले आहे.शुक्रवार २२ जुलै २०२२ रोजी जिल्हा महिला बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा जवाहरगेट स्थित मुख्य कार्यालयात घेण्यात आली.या सभेत बँकेच्या अध्यक्षपदी आ.सौ.सुलभाताई खोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सौ.रेश्माताई प्रमोद सावरकर यांची बिनविरोध वर्णी लागली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारीय राजेश भुयार,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश महल्ले यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या नावाची घोषणा करून पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषिकेश भामोदकर यांचेसह नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थित होते.
दि.अमरावती जिल्हा महिला सहकारी बँकेच्या वर्ष २०२२ ते २०२७ च्या पंचवार्षिक कार्यकारणी मंडळातील २१ संचालक पदासाठीच्या निवडणुकीत खोडके गटाचे २१ संचालक पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या कार्यकारणीमध्ये अमरावती महानगपालिका कार्यक्षेत्र मतदार संघातून आ.सौ.सुलभाताई संजय खोडके,सौ.अंजली शशिकांत चौधरी,संजीवनी दिनेश देशमुख,नीता आनंद मिश्रा,नांदगाव खंडेश्वर तालुका मतदार संघातून नीता दिलीपराव उगले,चिखलदरा तालुका मतदार संघातून उषा हरिओम उपाध्याय,दर्यापूर तालुका मतदार संघातून जोत्स्ना दीपक कोरपे,मोर्शी तालुका मतदार संघातून मंगलाताई अरुणराव कोहळे,भातकुली तालुका मतदार संघातून पुष्पाताई सुरेशराव गावंडे,धामणगाव रेल्वे तालुका मतदार संघातून हर्षा अनंत जगताप,अंजनगाव सुर्जी तालुका मतदार संघातून माधुरी प्रशांत ठाकरे,चांदुर रेल्वे तालुका मतदार संघातून दर्शना अमोल देशमुख ,वरुड तालुका मतदार संघातून सुधाताई सुरेंद्र पाटील,अचलपूर तालुका मतदार संघातून सोनाली प्रवीण पाटील,धारणी तालुका मतदार संघातून प्रीती श्रीपाल पाल,चांदूरबाजार तालुका मतदार संघातून दीपाली अश्विन भेटाळू ,अमरावती तालुका कार्यक्षेत्र मधून अर्चना संजय शिंदे,तिवसा तालुका मतदार संघातून रेश्माताई प्रमोद सावरकर,तर विमुक्त जाती / भटक्या जमाती वि. मा. प्रवर्ग मतदार संघातून ज्योती अरविंद धोपटे,अनुसूचित जाती-जमाती मधून मंदाकिनी नरेंद्र बागडे,तसेच इतर मागासवर्गीय मतदार संघातून सुचिता मधुकर काळे,यांचा समावेश आहे.यावेळी जिल्हा महिला बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले.
जिल्हा महिला बँकेत २६ वर्षांपासून आमदार सुलभाताई संजय खोडके यांचे वर्चस्व
जिल्हा महिला बँकेच्या अध्यक्षपदी आ.सौ.सुलभाताई संजय खोडके वर्ष १९९६ पासून विराजित आहेत.गेल्या २६ वर्षापासून बँकेची धुरा यशस्वीपणे सांभाळून त्यांच्या नेतृत्वात जिल्हा महिला बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे.महिलांच्या आर्थिक विकासाला केंद्रबिंदू मानून सहकार नेत्या तथा विद्यमान नवनिर्वाचित अध्यक्ष आ.सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी गतिमान प्रशासन व पारदर्शक कारभार चालवून जिल्हा महिला बँकेचा नावलौकिक सहकार क्षेत्रात उंचावला आहे.यापुढेही सर्व संचालक मंडळाची साथ तसेच सभासद व कर्मचारी यांची यशस्वी सांगड व सुसंवादातून जिल्हा महिला बँकेच्या विकासातून महिलांना आर्थिक सुबकता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विचार नवनिर्वाचित अध्यक्ष आ.सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केला.