
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनील झिंजूर्डे पाटील
गंगापूर – शिवसेनेचे नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज गंगापूर शहरात शिवसंवाद दोऱ्यानिमित्त आले असता गंगापूर शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या वतीने त्यांच्या सत्काराचे नियोजन छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले होते. या प्रसंगी त्यांनी शिवसैनिकांना संबोधीत करताना म्हणाले कि शिवसेनेने या गद्दारासाठी काय कमी केले. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व स्व बाळासाहेब ठाकरे यांना मिट्टी मारणाऱ्या माणसाला सर्वस्व देऊनही पाटीत खंजीर खूपसला असून शिवसैनिक अजून आक्रमक झालेला नाही. येणाऱ्या काळात सर्वांचे मुखवटे फाटणार असून दगाबाज सरकार पडणार आहे. यावेळी पावसाची सुरवात हॊताच पावसासारखा प्रेमाचा पाऊस माझ्यावर पडावा असे उदगार काढले.राजकारणात चांगल्या लोकांसाठी स्थान निर्माण असून यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. पुढील कार्यक्रमाला जात असताना कायगाव टोका येथे त्यांनी मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेले काकासाहेब शिंदे यांना अभिवादन केले. यावेळी मा. खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे,कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत, नंदकुमार घोडले, मंदार चव्हाण, लक्ष्मण सांगळे, अविनाश पाटील, दिनेश मुथा, कृष्णा पाटील डोणगावकर, मच्छिन्द्र देवकर, सुभाष कानडे, विजय पानकडे, भागेश गंगवाल, आबासाहेब शिरसाठ,ऋषी धाट, प्रकाश जैस्वाल, लक्ष्मणसिंग राजपूत, पोपटराव गाडेकर,अर्जुन कऱ्हाळे,, गोविंद वल्ले, करण खोमणे, आकाश लेकुरवाळे इत्यादी शिवसैनिक युवासैनिक व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.