
दैनिक चालू वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी -मानिक सुर्यवंशी
देगलूर( दि.२३) देगलूर तालुक्यातील मुजळगा येथील रहिवाशी इंजि.गजानन दीनानाथराव पाटील मुजळगेकर यांना सामाजिक कामाची जाणीव असून याच सामाजिक कामाची पोचपावती म्हणून त्यांना देगलूर तालुका मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात अली आहे.
मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष उद्धवराव सूर्यवंशी, जिल्हा सचिव रमेश पवार यांच्या शुभहस्ते गजानन पाटील मुजळगेकर यांना नियुक्त पत्र देऊन त्यांच्या पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिले आहेत.यावेळी बिरादार सर,आनंद कोसंबे,प्रदीप मोरे,नारायण पाटील वडजे,संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष जेजेराव पाटील,देविदास पाटील थडके,यांची उपस्थिती होती.तालुक्यातून विविध क्षेत्रातून मान्यवरांचे अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.