दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
दोघेही महसूल खात्याचे कर्मचारी चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्हारपूर तालुक्यातील बल्हारपूर साजाचा बहूचर्चित तलाठी रोहितसिंग चव्हाण यांना तलाठी दप्तर मधील निष्काळजीपणा भोवला असून त्यांना उपविभागीय अधिकारी डॉ.दिप्ती पाटील यांनी दि.८जून रोजी एका आदेशान्वये निलंबित केले आहे.संबंधित तलाठ्याच्या बाबतीत यूवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकारी प्रिया झांबरे यांनी राज्याचे मुख्य सचिवांसह नागपूरच्या विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या कडे बरेचदा लेखी तक्रारी नोंदविल्या होत्या .त्या नंतर काही दिवसांतच रोहित सिंग चव्हाण यांचे दप्तर बल्हारपूर उपविभागीय कार्यालयात बोलाविण्यात आले होते .उपविभागीय अधिकारी पाटील यांनी त्यांचे दप्तराचे बारकाईने निरीक्षण केले असता त्यांना त्या दप्तरात तब्बल सोळा त्रूट्या आढळूण आल्या .तलाठी दप्तर मधील अतिशय महत्वाचे नमुणे त्यांनी अद्यावत केले नसल्याचे प्रामुख्याने निदर्शनास आले. या शिवाय रोकड वही , अतिक्रमण रजिस्टर , गांव नमुना दोन , आठ ब हे देखिल वर्ष भरापासून तलाठ्याने पूर्ण केले नसल्याचे एकंदरीत दिसून आले. शासनाच्या व जनतेच्या कामात सातत्याने निष्काळजीपणा करणा-या या बहूचर्चित तलाठ्यावर शेवटी निलंबनाची कारवाई झाली.सध्या हे तलाठी महाशय निलंबित असून त्यांचे मुख्यालय एसडीओ कार्यालय देण्यात आले असल्याचे समजते . रोहित सिंग चव्हाण यांचे निलंबनाची जिल्हाभर महसूल विभागात चर्चा सुरू असतानाच याच चंद्रपूर जिल्ह्याच्या राजूरा उपविभागातील वरुर रोड येथील पटवारी विनोद गेडाम यांस एका रेती व्यवसाय करणाऱ्या कडून तब्बल २५हजार रुपयांची लाच मागणी केल्या( एका जूण्या ) प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचा-यांनी दि.१९जूलैला संध्याकाळी ताब्यात घेतले .लाच देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा आहे याची पूरेपूर जाणीव असतांना देखिल या तलाठी बुवाला लाच मागणीचा मोह आवळता आला नाही. हे येथे उल्लेखनिय आहे.विनोद गेडाम यांचे तलाठी दप्तर मधील काम चांगले असून त्यांचा कामाचा उपराजधानी नागपूर मुक्कामी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत काही वर्षांपूर्वी गौरव झाला .या थाटात झालेल्या गौरवाच्या बातम्या छापून देखिल आल्या अनेकांनी त्यांचे तोंड भरुन कौतुक ही केले . महाभयानक कोरोना काळातही त्यांचे योगदान तेव्हढेच मोलाचे ठरले .अनेक मित्र मंडळीनी त्यांचे या उल्लेखनिय कामाची प्रशंसा सुध्दा केली आहे.पण विनोद गेडाम उपरोक्त लाच मागणी प्रकरणात अडकल्यामुळे त्यांचे नांव परत एकदा आता चांगलेच चर्चेत आले आहे .राजूराभर या प्रकरणाची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. विशेष म्हणजे शहरातील पानटपरी व चहा टपरीवर सुध्दा विनोद गेडाम यांचे याच “लाच मागणी प्रकरणाची “चर्चा कानावर पडत आहे.
