
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूमःशिवसेना ,युवासेना पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ चालु आसुन भूम – परांडा -वाशी विधानसभा आमदार तानाजी सावंत यांनी बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेले असल्यामुळे त्यांना शह देण्यासाठी शिवसेना युवा सेनेच्या पदधाधिकारी यांचा मध्ये फेरबदल केला असुन युवासेना भूम -परांडा -वाशी विधानसभा प्रमूख म्हणून प्रल्हाद आडागळे यांची शिवसेना पक्ष प्रमूख उद्धव ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरून निवड करण्यात आली आहे
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या व युवा सेना प्रमुख युवकांचे हृदय सम्राट आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरून परांडा विधानसभा प्रमूख म्हणून निवड करण्यात आली खासदार ओमराजे निंबाळकर , आमदार कैलास पाटील ,शिवसेना सहसंपर्क प्रमुख शंकरराव बोरकर , माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील ,शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके युवासेना जिल्हा प्रमुख डॉ . चेतन बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरिल नवनियुक्त परांडा विधान सभा प्रमुख म्हणून प्रल्हाद आडागळे तसेच चिंचपुर ढगे येथील उपसरपंच युवासेना तालुका प्रमुख म्हणून सुधीर ढगे भूम शहर युवा सेना शहरप्रमुख अविनाश जाधव यांची निवड करण्यात आली आसुन त्यांच्या निवडीमुळे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.