
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी- आपसिंग पाडवी
देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या महामहिम द्रौपदी मुर्मु यांच्या राष्ट्रपती पदाच्या शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा आमदार गिरीश महाजन हे सकाळीच अककलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या
अतिदुर्गम भागातील कुशीत असलेल्या गोरजाबारी या आदिवासी गावात दाखल होवुन भर पाऊसात गावातील महिला पुरुषांच्या सोबत आनंद उत्सव साजरा केला यावेळी परिसरातील गावातील महिला पुरुषांनी एकत्र येत ढोल वाजवत नृत्य करत आपल्यातील महिला आदिवासी या देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झाल्या बद्दल आनंद व्यक्त केला गिरीश महाजन यांनी यावेळी देशात नरेंद्र मोदींनी प्रथमच एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदाचा सन्मान दिला असून हा सर्व जगात कौतुकाचा विषय ठरला आहे त्याबद्दल मोदींजींचे आभार व्यक्त केले पाहिजेत व आपल्या सर्वांसोबत हा आनंद साजरा करायला मिळतोय याचा मला अभिमान वाटतो आहे असे विचार व्यक्त केलेत
यावेळी गिरीश महाजन यांच्या सोबत जिल्हाधिकारी मनिषा खत्री, प्रांताधिकारी डॉ मैनाक घोष, भाजपाचे अनुसूचित जमाती चे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी,मंडळ अध्यक्ष विनोद कामे, प्रदेश सदस्य राजेन्द्र गावीत, पंचायत समिती सदस्य अॅड सुधिर पाडवी, किशोर पाडवी, ओबीसी मंडळ तालुका अध्यक्ष सुनील सुर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष भुपेन्द्र पाडवी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुणाल जैन,शहर अध्यक्ष किरण पाडवी, सुनिल सोनवणे,रोहिदास लोहार, दारासिंग वळवी,अक्षय पाडवी, गोमा राऊत काथा वसावे, रमेश नाईक ,अशोक पाडवी,अंबर तडवी,संजय पाडवी, संदिप पटेल,महेंद्र पटेल,झालुबाई तडवी, यांच्या सह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.