
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता. प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
अहमदपूर :-मागील ७ ते ८ वर्षा पूर्वी जमीनीवर आसलेले जीवनावश्यक वस्तुचे तसेच इंधनाचे दर आज गगनाला भिडलेले आहेत.त्याच बरोबर टैक्स ,इन्सुरंस,फायनांस कंपनीच्या व्याजा मधे पण भरमसाठ दरवाढ झालेली आहेच.या दरवाढिच्या शर्यती मधे स्कुल,काँलेज व हाँस्पीटल देखील मागे राहिलेले नाहित.
या दरवाढीच्या शर्यती मधे जर कोणी मागे आसेल तर ते आहेत रिक्षा चालक.कारण त्यांच्या रिक्षांचे शासन ठरवते.
जसे की शेतकरी शेतमाल पिकवतो व आडत्या त्याचे दर ठरवतो.तसेच रिक्षा चालक मालकांच्या संदर्भात आहे.रिक्षाचे डाउन पेमेंट मालकाने भरायचे,RTO चे सर्व टैक्स मालकाने भरायचे ,हप्ते मालकाने भरायचे,रिक्षाची देखभाल ,दुरूस्ती मालकाने करायची, इंधन पण मालकानेच भरायचे व भाडे मात्र सरकारने ठरवून दिले तेच घ्यायचे.
मागील ७ ते ८ वर्षा पूर्वी सरकारने ठरवून दिलेल्या दरा नुसार आज हि अँटो चालक त्याच जुन्या दराने रिक्षा चालवतात.सर्वच स्तरावार दरवाढ झालेली आसतांना देखील शासनाच्या वतीने मिटर रिक्षाची दरवाढ करण्यात आलेली नाहिये. त्या संदर्भात औरंगाबाद शहरातील विविध रिक्षा चालकांच्या विविध संघटनांनी मागील काहि महिन्या पासून सततचे निवेदन देऊन पाठ पुरावा चालू ठेवलेला होता.त्या अनुषंघाने या पूर्वी औरंगाबादचे जिल्हा अधिकारी श्री चव्हाण साहेब यांच्या सोबत रिक्षा चालकांची एक बैठक पण झाली होती.तेव्हा श्री.चव्हाण साहेबांनी कुठलेच ठोस आसे तोंडी वा लेखी आश्वासन दिले नव्हते व अगोदर बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लावा नंतर दरवाढीवर निर्णय घेऊ आसे उत्तर दिले होते.
आज दि.२५/०७/२०२२ रोजी कलेक्टर साहेबांच्या दालना मधे परत त्याच मागण्या संदर्भात मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते.आजच्या मिटींगला जिल्हा अधिकारी श्री चव्हाण साहेब,परिवहन अधिकारी श्री मैत्रेवार साहेब व ट्राँफीकचे श्री बहूरे साहेब उपस्थीत होते.
बेशिस्त रिक्षा चालकांच्या बाबतीत वरील अधीकार्यांनी आज परत एकदा नाराजी व्यक्त केली व रिक्षा चालकांच्या समस्या पण अस्थेवाइक पणे ऐकूण घेऊन त्यावर त्वरीत उपाय योजना केल्या जातील आसे आश्वासन दिले.
परंतु रिक्षाच्या दरवाढी बाबत रिक्षा संघटकांनी श्री चव्हाण साहेबांना वारंवार विचारणा करूण देखील कलेक्टर साहेबा कडून समाधान कारक उत्तर मीळत नव्हते.
शेवटी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर साहेबांनी जिल्हा अधिकारी श्री चव्हाण साहेबांना विनंती केली की मागील काहि वर्षा पासून आम्ही 17 सप्टेंबर हा ड्राव्हर डे मणुन साजरा करत आहोत.करीता 17 सप्टेंबर पूर्वी मणजे ड्राव्हरडेच्या अगोदर आपण अँटो रिक्षाच्या दरवाढी बाबत निर्णय घेऊन चालकांना चालक दिनाची आपल्या वतीने भेट द्यावी अशी विनंती करण्यात आली व जिल्हा अधिकारी श्री चव्हाण साहेबांनी श्री संजय हाळनोर साहेबांच्या विनंतीला अनचसरुण 17 सप्टेंबर पूर्वी दरवाढ निश्चीत केली जाईल आसे तोंडी परंतु ठोस आश्वासन देऊन रिक्षा चालकांना दिलासा दिला.
आजच्या मिटिंगला जय संघर्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर साहेब उपस्थीत होते ,तसेच संस्थेचे जि.अध्यक्ष श्री लक्ष्मण आण्णा सोनवणे ,श्री अब्बास खान,श्री सुनिल आप्पा व श्री सचिनभाऊ थोरात उपस्थीत होते.परंतु श्री सचिनभाऊ थोरात हे मोबाइल मधे आमचे फोटो काढण्यात व्यस्त ह़ोते मणुन ते फोटो मधे दिसत नाहि आहेत.
तसेच इतर रिक्षा संघटनेचे पदाधीकारी श्री शेख सरवर (कँप्टन),श्री शेख लतिफ,श्री इम्रान पठाण,श्री खाजा खान,श्री निसार अहेमद,श्री नाहेद फारुकी,श्री एम.डी.फारुखी,श्री मनोज जैस्वाल व श्री जाकेर खान इत्यादिंनी मुठभर बेशिस्त रिक्षा चालकांची शिक्षा ढिगभर प्रामाणीक रिक्षा चालकांना व त्यांच्यावर अवलंबून आसणार्या परिवाराला देऊ नये व लवकरात लवकर मिटर रिक्षाची दरवाढ करण्या संदर्भात विनंती करण्यात आली.