
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी .
सातारा जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे माझे खरोखर भाग्य आहे. सातारा जिल्हा हा ऐतिहासिक आणि शूरवीरांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्यांची चांगलीच ओळख आहे. सातारा जिल्ह्यांचे प्रलंबित प्रश्नांचा अभ्यास करुन ते प्रश्न सोडविण्यांचा आणि त्यासाठी लागणाऱ्या अंमलबजावणीचा माझा पुरेपूर प्रयत्न असेल अशी ठाम ग्वाही सातारा जिल्ह्यांचे नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. यावेळी सातारा जिल्ह्यांचे मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी जिल्ह्यांचा पदभार नवीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना सोपवून निरोप घेतला. सातारा जिल्हा यंत्रणेची अधिकृतरित्या सूत्रे स्वीकारल्यानंतर जयवंशी यांनी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. ते पुढे म्हणाले सातारा पश्चिम महाराष्ट्रांमध्ये जिल्हाधिकारी म्हणून माझी पहिलीच बदली असून सातारा जिल्ह्यांमध्ये काम करण्यांची संधी मिळणे हे माझे मोठे भाग्यच आहे. जिल्ह्यांतील प्रलंबित प्रश्न यांचा प्रशांसनाच्या माध्यमांतून मी अभ्यास करणार असून प्रश्नांच्या अनुषंगाने संपूर्ण आठवडाभर माझा जिल्हा दौरा राहील. मी हिंगोली जिल्हाधिकारी असताना कोरोनाच्या संक्रमण काळात शासन नियमावलीचा आम्ही पुरेपूर वापर केला आणि ही लाट थांबविण्यांत मला हिंगोली जिल्ह्यांमध्ये चांगलेच यश मिळाले. कोणत्याही कामाचे मूळ समजावून घेऊन त्याची सोडणूक करणे ही माझ्या कामाची पद्धत आहे यामध्ये नागरिकांच्या जास्तीत जास्त सूचना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून तुम्हां पत्रकारांच्या सूचना माझ्यासाठी अत्यंत महत्त्वांच्या असतील. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयांने जिल्ह्यांचा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात संदर्भात आणि योजनांची अंमलबजावणी करण्यामध्ये माझा आग्रह राहणार आहे. या चर्चेच्या दरम्यान पत्रकारांनी सातारा मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामांच्या निवेदना संदर्भात लक्ष घालण्यांची विनंती केली हे प्रश्न कामांच्या अनुषंगाने माझ्यासमोर येणारच आहेत. तेव्हा हा प्रश्न निश्चिंत निकाली काढू जर माझ्या कामांमध्ये सक्षमता असेल तर शासन मला येथे आणखीन तीन वर्ष कामाची संधी देईल नाहीतर माझी पुन्हा बदली करेल. यावेळी नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या सहा वर्षाच्या मुलाचा एक विनोदी किस्सा सांगितला माझा मुलगा विवान यांने भिलार येथे स्ट्रॉबेरीची शेती पाहून शेतात स्टोबेरी तोडण्यांचा हट्ट माझ्याकडे धरला होता. त्यानिमिंत्त मी एकाच महिन्यांपूर्वी महाबळेश्वरला पर्यटनासांठी आलो होतो त्यावेळी सातारा जिल्ह्यांत बदली होईल असे मनात चुकूनही वाटले नव्हते आणि आज महिन्याभरांतच माझी सातारा जिल्हाचा जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली हा एक गमतीशीर योगायोग रुचेश जयवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.