
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
श्री शिवाजी प्राथमिक , माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज माणिक नगर , नवीन कौठा नांदेड येथे 26 जुलै 2022 रोजी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे संस्थापक , संचालक , ज्येष्ठ संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व आमदार डॉ. भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने शाळा व कॉलेजच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या गुणगौरव सोहळ्यासाठी ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी तथा माजी आमदार संस्थेचे सचिव भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व संस्था सहसचिव एँड. भाई मुक्तेश्वरभाऊ धोंडगे साहेब , प्रा.डॉ.पूरणशेट्टीवार व्यंकटलक्ष्मी ( ज्येष्ठ साहित्यिका ) ,श्री शि.मो.ए.सो.कंधार चे संचालक प्रा.वैजनाथराव कुरुडे , शालेय समिती सदस्य श्री मधुकरराव पी.कुरुडे तसेच शालेय समिती सदस्य तथा माजी कार्यालयीन अधीक्षक मा.सूर्यकांत कावळे व नवनिर्वाचित शालेय समिती सदस्य तथा कार्यालयीन अधीक्षक इंद्रजीत बुरपल्ले , प्रा.डि.बी.जांबरुनकर ( माजी मंडळ सदस्य लातूर , जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड ) तसेच प्रा.गजाननराव पांपटवार ( जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड ) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने झाली आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी बोर्ड परीक्षा मार्च 2022 मधील कला , वाणिज्य व विज्ञान शाखेतील माणिक नगर व नवीन कौठा शाखेतून प्रथम , द्वितीय , तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने गुणगौरव करण्यात आला तसेच कवठा शाखेमध्ये मातोश्री मुक्ताई यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात संस्थेचे सचिव भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांच्या हातून करण्यात आले आणि गुणगौरव सोहळ्यात मेडिकल प्रवेशास प्रवेशित झाले आहेत , नीट , एम. आय. टी., जेईई अभ्यासक्रमास प्रवेशित झाले आहेत अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . तसेच राष्ट्रीय सायकलिंग क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याबद्दल खेळाडूचे सुद्धा अभिनंदन करून गौरव करण्यात आला.
तसेच बारावी बोर्ड परीक्षा 2022 मध्ये विषय निहाय प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय शिक्षकाकडून प्रत्येकी एक हजार एक रुपये व शालेय साहित्य बक्षीस देऊन गुणवंताचा व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमातील दिग्गज मान्यवरांनी मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच संस्थेचे सचिव माजी आमदार तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी संस्था उभारणीत मातोश्री मुक्ताई धोंडगे यांचे योगदान तसेच डॉ.भाई केशवराव धोंडगे साहेब यांचे समर्पण व प्रयत्न यावर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना प्रेरित केले. तसेच अँड. मुक्तेश्वर भाऊ धोंडगे यांनी मातोश्री मुक्ताई धोंडगे यांचा जीवनपट व शाळा उभारणीसाठीचे योगदान आणि गोरगरिबांच्या मुलांनी शिकले पाहिजे हा मातोश्री मुक्ताई चा मोलाचा विचार व संदेश विद्यार्थ्यांच्या समोर जशास तसा मांडला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर भाऊ कुरुडे , उप मुख्याध्यापक डि.पी.कदम , ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य परशुराम येसलवाड , पर्यवेक्षक माधव ब्याळे , माध्यमिकचे पर्यवेक्षक श्री शिवराज पवळे , श्री सदानंद नळगे , कौठा इन्चार्ज प्रा. सय्यद जमील , ज्येष्ठ प्रा. मुरलीधर घोरबांड , प्रा. वसंत राठोड , प्रा.लुंगारे ज्ञानेश्वर , प्रा. अमर दहिवडे , प्रा.जयवंत यानभुरे , प्रा.श्रीवास्तव दिपक , प्रा. देशमुख शिवशंकर , प्रा.दिग्रसकर योगेश , प्रा.शेख उमर , प्रा.गोविंद मोरे , प्रा.सोनटक्के शिवानंद , प्रा.गायकवाड संतोष , प्रा. विक्रम लुंगारे , प्रा.कपील सोनकांबळे , प्रा.स्वाती कान्हेगावकर , प्रा. संगिता स्वामी , प्रा.प्रतिभा जाधव , प्रा.दिपा जामकर , प्रा.रत्नमाला नवघरे , प्रा. रेश्मा शेख , प्रा.शिल्पा पारेकर , प्रा.वैशाली दुलेवाड , प्रा.तेजस्विनी कोंडेकर , श्री प्रशांत कुरुडे ,श्री बालाजी निरपणे , श्री समर्थ लोखंडे , तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. कैलास पतंगे , सहाय्यक प्रा.निलेश मोरेश्वर आणि प्रा.रूपाली कळसकर या सर्वांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर भाऊ कुरुडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.निलेश मोरेश्वर आणि प्रा. रूपाली कळसकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी तुळसाबाई शिंदे / जाधव , संतोष भांगे प्रभाकर जाधव यांचे ही योगदान मोलाचे ठरले. या कार्यक्रमाची सांगता / समारोप ढोल ताशाच्या गजरात लयबद्ध तालात व सुरात राष्ट्रगीताने प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव यांनी केली.