
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
औरंगाबाद महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथक मार्फत आज महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप ) येथे वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमणे काढण्यात आली.
याठिकाणी नेहमी वाहतूक ठप्प होत होती . या बाबत मा. प्रशासक तथा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, व मा. अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांनी दोन महिन्यांपूर्वी या चौकामध्ये पाहणी करून वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत बांधकामे अतिक्रमणे काढणे बाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने या परिसरातील व्यापाऱ्यांना नागरिकांना नियमानुसार नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तरीदेखील हे दुकानदार प्रशासनाला सहकार्य करत नव्हते. यामुळे या ठिकाणी तासनतास वाहतूक ठप्प होणे व लहान-मोठे अपघात होत होते. आठ दिवसापूर्वी महावीर चौक येथे दुचाकी आणि चारचाकी मुळे आपसात वाद होऊन मोठे भांडण झाले होते. त्या अनुषंगाने आज सकाळी महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यापासून पंधरा फूट पर्यंत अतिक्रमणे काढण्यात आली.
तसेच पथकामार्फत आज नागेश्वरवाडी येथील स्मिता नागेश यांची मालकी असलेले अनधिकृत बांधकाम थांबवून बांधकाम साहित्य जप्त करण्यात आले.