
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-सलमान नसीम अत्तार
(धाड सर्कल)
धाड..
गेल्या अनेक वर्षांपासून म्हसला खुर्द फाट्यावर जलद बस थांबा मिळावा यासाठी स्थानिक गावकऱ्यांची मागणी होती, त्यासाठी गावातील काही प्रतिष्ठीत नागरिकांनी एकत्र येऊन संबंधित विभागाला वेळोवेळी निवेदने दिली. यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार मा. सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी पाठपुरावा करुन बुलडाणा जिल्ह्यातील सर्व आगाराच्या जलद बसला थांबा मंजुर करुन दिला. त्यामुळे वेळेची व पैशाची बचत होऊन निश्चितच संपुर्ण गावाला याचा फायदा होईल.
आज म्हसला खुर्द येथे सकाळी १० वा. गावकऱ्यांनी “शेगांव ते कन्नड” जाणाऱ्या बसचे फाट्यावर ‘स्वागत’ करत “चालक व वाहक” बंधुचा ‘रुमाल-टोपी’ देऊन प्रातिनिधिक स्वरुपात ‘सत्कार’ केला व उपस्थितांना मिठाई वाटप केली. प्रसंगी गावकऱ्यांनी मा.सौ.श्वेताताई महाले पाटील व राज्य परिवहन महामंडळाचे विषेश आभार मानले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देविदास पाटील जाधव, भाजपा जेष्ठ नेते श्रीरंग येंडोले, भाजपा तालुका उपाध्यक्ष विष्णु पाटील वाघ व गजानन देशमुख, भाजपा नेते राजु चांदा, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत, यांचेसह जेष्ठ नागरिक विठोबा पाटील तायडे, अर्जुन जाधव, सरपंच गणेश भोंडे, उपसरपंच अमोल उबाळे, पोलिस पाटील शिवा तायडे, पुरुषोत्तम भोंडे, अरुण भोंडे, उद्धव भोंडे, अनिल अपार, विनोद तायडे, विकास तायडे, संतोष तायडे आदी मान्यवरांसह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.