दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
चंद्रपूर :- आजच्या घडीला पाहता मूळनिवासी समाज विविध अंगी मागासलेला समजला जातो. आणि समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आज अनेक सामाजिक कार्यकर्ते समाजात कार्यरत आहे, त्यांची दखल समाजाने घेऊन त्यांचा उत्साह द्विगुणित करावा या हेतूने येथील गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेतर्फे विविध मान्यवरांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
जिल्हातील राजुरा येथील रहिवाशी असलेले गोंडवाना गणतंत्र पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष, प्रकल्प स्तरीय आढावा बैठक व नियोजन समितीचे माजी अध्यक्ष, गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था जिवतीचे सचिव बापूरावजी मडावी यांना गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेच्या वतीने दादा हिरासिंह मरकाम गोंडवाना रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बापूराव मडावी यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. समाज प्रबोधन, समाज जागृती, विद्यार्थी – युवकांना सतत मार्गदर्शन, समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात शासन आणि प्रशासन दरबारी समाजाचा आवाज ते बुलंद करतात. विविध माध्यमातून ते समाजाचे विविध प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करतात, आज पर्यंत त्यांनी विविध मोर्चे, आंदोलनांच त्यांनी नेतृत्व केल आहे.
त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्यासाठी गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था जिवतीचे अध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, गोंडराजे वीरेंद्रशहा आत्राम, जनसेवा गोंडवाना पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धीरज शेडमाके, इको प्रो सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बंडुजी धोतरे, नागपूर येथील नामांकित डॉ. श्रीनिवास सुरपाम, सक्सेस अकॅडमी पुणे चे संचालक किरण नैताम, गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेचे अध्यक्ष सुधाकरजी कन्नाके व सर्व संचालक तथा शिक्षकवृंद, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते.
