
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
शेंबा बु. (नांदुरा): दि.२७. नांदुरा मोताळा रोडवरील शेंबा हे गाव मोठे असून पंधरा-वीस खेडे लागून असून मोठ्या प्रमाणात रहदारी चालू असते. या ठिकाणी शाळा, कॉलेज, दवाखाने, बँक,खताचे मोठ मोठे दुकाने आहेत.
बाजारपेठेचे गाव म्हटल्यास हरकत नाही. त्यामुळे नेहमीच वर्दळ असते.
सदर रोडचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत काम चालू असून बसस्टॉप वरच शेंबा बु. रोडला पडलेले खड्डे दुर्लक्षित आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यात साचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बस स्टॉप वरती नाल्यांचे काम झालेले असून गावामध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर चिखल साचला आहे. तो काढण्यात आला नाही किंवा त्याच्यावरती भर टाकण्यात आलेली नाही?. तसेच गणपती मंदिराजवळील पाण्याची टाकी बांधकाम विभागामार्फत तोडण्यात आली आहे तिचे अजून बांधकाम झालेले नाही. आपण दहा ते पंधरा दिवसात काम पूर्ण न केल्यास, वरील विषय आपण जाणीवपूर्वक न घेतल्यास येत्या पंधरा ऑगस्ट (दि.१५_८_२०२२)रोजी शेंबा बस स्थानकावर लोकांना आंदोलन करून रास्ता रोको करण्यात येईल. होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव आपल्या वरती राहील याची नोंद घ्यावी.
ॲड- नंदकिशोर खोंदले (सरपंच)
शेंबा.