
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा – तालुक्यासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले अनेक ठिकाणी पुलाची दुरावस्था पहावयास मिळत आहे . तर या सर्व बाबींचा विचार लक्षात घेऊन सामान्य जनता मतदार संघातील प्रतिनीधी रोष व्यक्त करत असल्याचे चित्र दिसुन येत आहे .
तालुक्यात मतदार संघात लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष ठेकेदार हिताय अधिकारी सुखाय असा सावळा गोंधळ प्रशासनाचा व लोकप्रतिनिधीचा दिसुन येत आहे.
लोहा तालुक्यात सुनेगाव भाद्रा पांगरी पेनुर सह अन्य भाग रिसनगाव मस्की बेरळी देऊळगाव अनेक गावांची रस्त्याची अवस्था सर आली धावून रस्ते गेले वाहून आशा प्रकारची वेळ मतदारसंघातील नागरीकांवर आली आहे.
तालुक्यात लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष पण या अवस्थेला कारणीभूत असल्याचा रोष नागरीकाकडुन पहावयास मिळत आहे. तालुक्यात काही रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत तर काही रस्त्यांची कामे थातुरमातुर झाल्याने ठेकेदारांची नावे काळ्या यादीत टाकुन संबंधित ठेकेदारांवर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
सुनेगाव – भाद्रा – पांगरी- पेनुर हा मार्ग परभणी – हिंगोली – नांदेड आशा तीन जिल्ह्यांना जोडला जाते यामार्गाने शेतकरी शेतमजूर व्यापारी नोकरदार दवाखान्यातील रुग्ण यांची यामार्गावर दररोज वर्दळ मोठ्या प्रमाणात असते या रस्त्याचा ञास सामान्य जनतेला होत आहे
येणाऱ्या काळात पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक जवळ आल्या असुन संबंधित रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास विविध संघटनांनी लोकप्रतिनिधी मतदारसंघ फटकु न देण्याचा इशारा सामन्य जनतेतून ऐकवयास मिळत आहे.