
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातून जीप, मोटार, ट्रॅक्टर, टेम्पो अशी वाहने चोरणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेने पकडले. चोरट्यांकडून वाहनचोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले असून १२ लाख २० हजारांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.
आबा दत्तात्रय डोके, वय २४ गणेश अरुण राऊत, वय ३४ दोघे रा. पेनुर,ता. मोहोळ जि. सोलापूर, धनाजी नागनाथ लोकरे वय ३७, रा .लवूळ ता.माढा, जि. सोलापूर, समाधान उर्फ माऊली शिवाजी चौरे वय ३२ अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आरोपींनी शहराच्या वेगवेगळ्या भागातून मोटार, जीप, ट्रॅक्टर अशी वाहने चोरली होती. थेऊर परिसरात मोकळ्या जागेत आरोपींनी वाहने लावून ठेवली होती. दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी अमोल सरतापे, संदीप येळे, राहुल इंगळे यांना याबाबतची माहिती मिळाली.
पोलिसांनी डोके, राऊत, लोकरे यांना पकडले. तपासात चोैरे याच्याशी संगमनत करुन वाहने चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपींने वाहन चोरीचे पाच गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तपासात वाहन चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.