
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम :शिवसेना पक्ष प्रमूख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिर्घ आयुष्य लाभावे यासाठी भूम शहाराचे ग्रामदैवत आलमप्रभू देवस्थान या ठिकाणी शिवसैनिकांनी महाआरती केली.
यावेळी माजी उपजिल्हा प्रमुख दिलीप शाळू ,युवासेना भूम – परांडा – वाशी विधानसभा प्रल्हाद आडागळे , मानधन व कलाकार समिती माजी जिल्हा अध्यक्ष महादेव वारे , युवासेना शहर प्रमुख अविनाश जाधव, माजी शहर प्रमूख रामभाऊ नाईकवाडी , सुनिल माळी , तालुका संघटक अँड श्रीनिवास जाधवर , उपतालुका प्रमुख अशोक वनवे, अँड प्रकाश आकरे , महीला आघाडी शहर प्रमुख उमादेवी रणदिवे यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते.