
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
मोखाडा तालुक्यातील शिरसगाव येथील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने यंत्राच्या साहाय्याने भात लागवड केली आहे,त्याची पाहणी श्री प्रदीप वाघ यांनी आज केली, यावेळी श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की शेतकरी बांधवांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी हे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतामध्ये जाऊन मार्गदर्शन करावे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल.यंत्रा मुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला असुन आर्थिक नुकसान टळले आहे,कमी मजुर व कमीत कमी वेळात शेती लागवड झाल्या मुळे शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी पारधे साहेब, कृषी सहाय्यक शेतकरी उपस्थित होते.