
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला असल्याकारणाने डी ए कुलकर्णी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मात्र त्यानंतर ते जेलमधून बाहेर येण्याची शक्यता कमीच आहेत. कारण त्याच्याविरोधात इतरही चार ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या गुन्ह्यांखाली त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना जामीन मिळालेला असला तरिही त्यांना कोठडीत राहावं लागणार आहे. मंगळवारी सुप्रीम कोर्टात डीएसकेंच्या (दीपक सखाराम कुलकर्णी) जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने निर्णय देत अखेर डीएसकेंना जामीन मंजूर केला. दरम्यान, गेल्या चार पेक्षा जास्त वर्ष झाले दीपक सखाराम कुलकर्णी हे कोठडीच आहेत. ठेवीदारांनी केलेल्या गुंतवणुकीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंचर चार वर्षांनी डीएसके यांना अल्पसा दिलासा मिळालाय.