
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. लातूरसह औरंगाबाद जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, राज्यात पुढील काही दिवस हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी लागणार आहे
मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची बैठकीसाठी पुन्हा एकदा केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी लागणार आहे. अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे राज्याचा गाडा हाकण्याची जबाबदारी केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावरच अद्याप तरी आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात आणि पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास आठ हजार हेक्टर शेत जमिनीला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतील. आज दुपारी बारा वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडेल. अतिवृष्टी असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची सोबत देखील या बैठकीतून मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याची माहिती आहे. यासोबतच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली होती. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांच्या या मागणीबाबत चर्चा होण्याची देखील या बैठकीतून शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात जोरदार पाऊस – सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. लातूरसह औरंगाबाद जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, राज्यात पुढील काही दिवस हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोराचा पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. तसेच लातूर, औरंगाबाद, जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.