
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -शाम पुणेकर
पुणे : मद्यधुंद चालकाने १३ वर्षीय शाळकरी मुलीला चिरडल्याची घटना काटी-वडापुरी (ता. इंदापूर) रोडवरती छोट्या कॅनल नजीक आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे घटनास्थळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर संतप्त जमावाने MH42T – 1653 हा ट्रक पेटवून दिला. मुलीला चिडल्यानंतर मद्यधुंद चालकास जमावाने ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
तृप्ती नाना कदम वय १३ वर्ष विद्यार्थीनीचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. तर गणेश नाना कदम वय १० ह्या विद्यार्थ्याला डोक्यास जबर मार लागल्याने इंदापुर येथील कदम बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे दोघेही सातवी व पाचवीमध्ये शिक्षण घेत होते. सकाळच्या सुमारास त्यांचे चुलते दुचाकीवरून शाळेत सोडवण्यासाठी जात असताना काटी वडापुरी रोडवरती खडीचा ओव्हरलोड टिपर हा घेऊन मद्यधुंद चालकाने पाठीमागून दुचाकीस जोरदार धडक दिली. यामध्ये तुप्ती व गणेश खाली पडले आणि ही दुर्घटना घडली.