
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी-किशोर वाकोडे
शेंबा(नांदुरा): दि.२९. महामार्ग १९६ नंबर रोडचे काम चालू असून पूर्वतवास आहे. परंतु कृषी विद्यालय शेंबा येथून पासून तर गणपती मंदिरापर्यंत साधारण एक ते दीड किलोमीटरच्या रस्त्यावरून वाहन चालवताना जीवघेण्या खड्ड्यांमुळे कसरत करून वाहन चालवावे लागते. आता तर पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचले तर बऱ्याचदा लहान मोठ्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. धोकादायक खड्डे पडलेल्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खड्ड्यांसंदर्भात शेंबा येथील सरपंच नंदकिशोर खोंदले यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग ला १५ ऑगस्ट रोजी लोटांगण आंदोलनाचा इशारा दिला होता. या संदर्भातील बातमी ‘दैनिक चालू वार्ता’ने दि.२८/.७/२०२२ रोजी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेऊन खड्डे बुजवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परता दाखवत दि.२९ /७/२०२२ रोजी खड्यामध्ये मुरूम टाकून जेसीबीच्या साह्याने पसररून लोलरने दबाई करण्यात आली असून खड्डे बुजवण्यात आले आहेत. सर्विस रोडचे काम बाकी असून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम मुख्य रोड व सर्विस रोडचे काम झाल्यानंतर करणार आहे. अशी माहिती सरपंच खोंदले यांनी दिली.