
दैनिक चालु वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर.
पन्हाळ्याचा इतिहास जाणुन घेण्यासाठी माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी भेट दिली त्यांना माहिती देण्याचे काम इतिहास आभ्यासक डाॕ.अमर अडके यांनी केले,
स्वच्छ पन्हाळा व ऐतिहासिक इमारती पाहुन त्यांनी आनंद व्यक्त करत नव्या जुन्याचा येथील संगम असल्याचे सांगितले पन्हाळ्याच्या इतिहासकालीन माहितीने ते प्रभावित झाले
माजी लष्कर प्रमुख पन्हाळ्याला येणार म्हणुन छ.शिवाजी पुल आंबेवाडीपासुन सर्व वाहतुक सुस्थितीत चालण्यासाठी कोल्हापूर पोलीस तैनात केले होते.तर पन्हाळ्यावरील सर्व पर्यटकांना दुपारीच बाहेर काढले होते झुणका-भाकर केंद्रे व सर्व व्यवसाय बंद ठेवले होते दर रविवारी म्हणजे हाउसफुल गर्दीचा दिवस असतो. पोलिसांनी एवढी फोज फाटा रस्त्यावर उभा केला होता की पर्यटन घाबरून परत जात होते रविवार असून मोकळे मोकळे दिसत होते
दरम्यान माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी सज्जाकोठी,साठमारी,संभाजी मंदिर,तीन दरवजा,आंधारबाव इ.ठिकाणे पाहिली सायंकाळी सहा वाजता ते न्युपॕलेस कोल्हापुर कडे रवाना झाले .