
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी-संघरक्षित गायकवाड
नरसी – आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते डी आर कांबळे नावाने पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले, आंबेडकरी कार्यकर्ते राहुल जिगळेकर यांचे वडील दत्ता कांबळे जिगळेकर यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दिनांक 31 जुलै 2022 रोजी सायंकाळी आठच्या सुमारास नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलं, मुली, सुना, नातवंड असा मोठा परिवारआहे. परिसरातील धाडसी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यावर दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी ठीक 3: 00 वाजता त्यांचे मूळ गाव जिगळा तालुका नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.