
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – संभाजी गोसावी
वाई तालुक्यांतील जांब गावचे शहीद जवान विजय सुदाम शिंदे वय ३९ ) यांना कर्तव्य बजावत असताना नांदेडमध्ये वीरमरण प्राप्त झाल्यांची माहिती लष्करी दलाच्या जवानांकडूंन शनिवारी दुपारी समजली. शहीद जवान विजय शिंदे हे भारतीय सैन्य दलांमध्ये सीआरपी पोस्टचे ते जवान होते. त्यांनी आत्तापर्यंत विविध राज्यांमध्ये देशसेवा सेवा बजावली होती. विजय शिंदे यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू पारदर्शक आणि प्रामाणिक असा होता गावातील विविध उपक्रमांना त्यांचा नेहमी सिंहाचा वाटा असायचा, त्यांचे माध्यमिक शिक्षण जांब या ठिकाणी झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण हे भुईज येथे शरदचंद्रजी पवार विद्यालयांमध्ये झाले होते. त्यांची लहानपणापासून सैन्य दलात भरती होण्यांचे स्वप्न होते.अखेर ते त्यांनी स्वप्न पूर्णता केले. शहीद जवान विजय शिंदे शेतकरी कुटुंबातील होते घरची हालाखीची परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण घेत भारतीय सैन्य दलामध्ये ते भरती झाले. त्यांचे शनिवारी दुपारी त्यांना वीरमरण प्राप्त झाल्यांची माहिती समजताच जांब गावासह वाई तालुक्यांमध्ये शोककळा पसरली. रविवारी रात्री उशिरा शहीद जवान विजय सुदाम शिंदे यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी जांब गावात दाखल होताच जांब ग्रामस्थांसह, पंचकोशीतील सर्व ग्रामस्थ मित्रपरिवार माता बहिणींना भारत माता की जय, अमर रहे विजय शिंदे अमर रहे अशा घोषणा देत शहीद जवान विजय शिंदे यांना अखेरचा सलाम देत निरोप घेतला. यावेळी सीआरपीचे जवानांनी हवेत गोळीबार झाडून शहीद विजय शिंदे यांना अखेरची मानवंदना दिली. तसेच भुईंज पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे साहेब व भुईंज पोलीस ठाण्यांचे बदोंबस्तीत असणारे पोलीस कर्मचाऱ्यांनी शहीद जवान विजय शिंदे यांच्या पार्थिवांचे अंत्यदर्शन घेत सलामी दिली. जांबगावचे ग्रामस्थ माता बहिणी मित्रपरिवार, पंचकोशीतील नागरिक तसेच जांब गावचे सरपंच ग्रामपंचायतचे सेवक वर्ग, तसेच वाई तालुक्यांतील राजकीय,सामाजिक शैक्षणिक,अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळींनी शहीद जवान विजय शिंदे यांच्या पार्थिवांचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. शहीद जवान विजय सुदाम शिंदे यांच्या जाण्यांमुळे जांबगाव सह परिसरांतून हळहळ व्यक्त होत आहे.