
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : विद्यमान व आगामी काळातील सण, उत्सव व राष्ट्रीय कार्यक्रम लक्षात घेऊन शहरात कुठेही अनुचित प्रकार घडता कामा नयेत शिवाय कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी परभणी – नानलपेठ पोलिसांच्या वतीने आपल्या कार्यक्षेत्रातील मुख्य रस्त्यावरील बाजार पेठा व मुख्य रस्त्यांवर पोलीस पथसंचलन केले.
अण्णाभाऊ साठे जयंती, मोहर्रम, श्रावण महिना आणि तोंडावर असलेला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी निमित्ताने शहरात घरोघरी साजरे केले जाणारे ध्वजारोहण आदी कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर बाजार पेठा, शनिवार बाजार, श्री छ्त्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी पार्क, मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, रेल्वे स्थानक परिसर, ग्रैंड कॉर्नर, अपना कॉर्नर आदी परिसरातून हे आयोजन करण्यात आले होते.