
दैनिक चालू वार्ता भिगवन प्रतिनिधि : जुबेर शेख
भिगवन : साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती भिगवन स्टेशन मधे साजरी करण्यात आली.या जयंती सोहळ्यात प्रतिमेचे पूजन मा भिगवन सरपंच पराग जाधव तसेच सरपंच तानाजी वायसे यांनी केले व मा उपसरपंच संजय रायसोनी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी मा उपसरपंच संजय रायसोनी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले,”तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी सातार्यातील वाळवा तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता अण्णा भाऊ साठे यांचे फार शिक्षण झाले नव्हते. तरी त्यांनी ३५ कादंबर्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य आणि १९ पोवाडे रचले आहेत. अण्णा भाऊ हे कम्युनिस्ट विचारसरणीचे होते तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते. वारणेचा वाघ, विजयंता, फकीरा, इभ्रत या कादंबरीवर चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत. आज अण्णा भाऊ यांची जयंती निमित्त त्यांचे विचार प्रत्येक समाजाने अंगीकारले पाहिजेत त्यांनी सांगितलेल्या वाटेवर चालले पाहिजेत” असे नमूद केले.
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद जगताप यांनी केले तर आभारप्रदर्शन दत्तात्रय शेलार यांनी केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब काळे, कपिल भाकरे,मा ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल मस्के,जब्बार शेख, जुबेर कुरेशी,दत्तात्रय शेलार,राजू गाड़े,गणेश शिंदे अनिल शेलार,प्रशांत शेलार,कमलेश शेलार,अक्षय शेलार योगेश शिदे, संदीप शेलार, विकास चादणें,नवनाथ लाडगे, मयूर शिंदे आदी उपस्थित होते.या जयंती सोहळ्यासाठी जयंती कमिटीने अथक परिश्रम घेतले.यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.