
दैनिक चालु वार्ता नीरा नरसिंहपुर प्रतिनीधी- बाळासाहेब सुतार
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील ग्रामपंचायत कार्यालया मध्ये सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती निमित्त सरपंच ज्योती बोडके व उपसरपंच पांडूरंग बोडके, सदस्य संतोष सुतार आणि ग्रामस्थ यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार आर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पिंपरी बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख म्हणून आजी, माजी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आदर्श ग्रामसेवक गणेश लंबाते, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित राहून प्रथीमे पूजन करण्यात आले. .साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार आचार तळा गाळातील लोकांनपर्यंत पोहोचवून विचारांची शिदोरी ग्रामस्थांनी घ्यावी.
तसेच देशातील सर्वोच्च अश्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे सरपंच ज्योती बोडके यांचे उद्गार.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपसरपंच पांडुरंग बोडके म्हणाले की. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी फक्त शाळेमध्ये जाऊन महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती,कला व लोकजीवन आपल्या साहित्याच्या माध्यमातून देशभरातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये पोहचवून महाराष्ट्रासह भारत देशाचे नावलौकिक संपूर्ण जगभरामध्ये पसरवले
आशा महान व्यक्तिमत्त्वाच्या लेखणीचा व कार्यकर्तृत्वाचा कायमस्वरूपी गौरव करण्यात यावा.
जयंतीसाठी कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल बांधवांना सरपंच ज्योती बोडके यांनी शब्दरूपी शुभेच्छा दिल्या.व यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.