
दैनिक चालू वार्तासातारा प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा जिल्हाधिकारी पदी नुकतेच नव्यांने रुजू झालेले रुचेश जयवंशी यांचे स्वागत तर मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा निरोप समारंभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहांत आयोजित करण्यांत आला होता. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुंगीलवार, सातारा जिल्हा बँकेचे मुख्य कार्याधिकारी राजेंद्र सरकाळे, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बहीण व सातारा जिल्ह्यांचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती. आँचल दलाल मॅडम यावेळी नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी पुढे म्हणाले स्वराज्यांच्या राजधानीत काम करण्यांची संधी मला मिळाली हे माझे मोठे भाग्यच समजतो तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुरु केलेली कामे यापुढेही सुरु ठेवणार आहे शासनांच्या प्रत्येक योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासांठी प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यांवर माझा भर राहणार आहे पर्यटना बरोबरच दिव्यांगांसाठीही उल्लेखनीय काम करण्यांचा प्रयत्न माझा राहील ज्याप्रमाणे शेखर सिंह यांना प्रशासकीय कामांत सहकार्य केले त्याचप्रमाणे यापुढेही सर्व विभागांने सहकार्य करावे असे नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी अशी अपेक्षा नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले सातारकरांनी केलेले प्रेम नेहमीच प्रेरणादायी ठरले सातारा जिल्ह्यांत केलेले काम तसेच विशेषता कोरोनांच्या संसर्गाच्या काळात केलेले काम माझ्या नेहमीच स्मरणांत राहील, कोरोनांच्या संकट काळामध्ये विविध निर्बंधांच्या आदेश काढण्यांत आले.या आदेशांचे नेहमीच सातारकरांनी पालन करीत मला चांगले सहकार्य केले सातारकर यांनी केलेले प्रेम नेहमीच माझ्या स्मरणांत आणि प्रेरणादायी ठरले असे प्रतिपादन मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केले. कोरोना संकटाच्या काळात पोलीस महसूल आरोग्य विभागांसह सर्वच विभागांने समन्वयांने काम केले. त्यामुळे मला सातारा करांनी केलेले प्रेम माझ्या कायम स्मरणांत राहील आणि सातारकरांची मला नक्कीच आठवण राहील असे आपले मत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केली या कार्यक्रमांमध्ये विविध शासकीय विभाग व संघटनेच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचा सत्कार करण्यात आला तर याचबरोबर मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा सहपत्नींक सत्कार करण्यांत आला. या कार्यक्रमाप्रसंगी सातारा जिल्ह्यांतील सर्वच विभागांतील अधिकारी कर्मचारी पोलीस प्रशासन नागरिक पत्रकार आदीं बहुसंख्येने नागरिक उपस्थिंत होते.