
दैनिक चालु वार्ता आटपाडी तालुका प्रतिनिधी-दादासो वाक्षे
आटपाडी:-
आटपाडी येथे आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारणी ची बैठक बैठकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक ,पक्ष निरीक्षक अक्षय भांड , प्रदेश सरचिटणीस राजू शेठ जानकर, प्रदेश सचिव एन.पी. खरजे , युवक तालुका अध्यक्ष सुरज पाटील यांच्या उपस्थित पार पडली.
यावेळी बोलताना विराज नाईक यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या माध्यमातून सर्व सामान्य घटकाना न्याय देण्याचे काम करावे व त्यातून पक्ष संघटना मजबूत करावी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती मधे राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची ताकद दाखऊन द्यावी.
पक्ष निरीक्षक अक्षय भांड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आटपाडी त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे काम चांगले आहे पण येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांनी पुढं आल पाहिजे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्ष निश्चित संधी देईल.
राजू जानकर बोलताना म्हणाले की कितीही संकट आली तरी आपली पक्ष निष्ठा कमी होता कामा नये जोमाने काम करून आपण सर्व जण संघटना मजबूत करू.
एन पी. खरजे यांना पक्षाने संधी दिली तर जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढविणार – सर्वसमावेशक उच्च शिक्षित पदाधिकारी प्रा नारायण खरजे आटपाडी तालुक्यात सर्व सहकारी चांगले काम करत आहेत पण राष्ट्रवादी युवक काँग्रेस मजबूत करण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ताकद देणं गरजेचं आहे.
तालुका अध्यक्ष सुरज पाटील यांनी आटपाडी तालुक्यात आगामी निवडणुकीत युवकांना प्राधान्य द्यावे पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्या मागे युवक राष्ट्रवादी ताकतीने उभा राहील तसेच युवक संघटना बांधणी करण्या साठी पक्षातील नेत्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आटपाडी तालुक्याचे संपर्क अभियान व विचार गावगाड्या पर्यंत पोहचवण्याचे काम युवक राष्ट्रवादी करेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी आर पी आय चे युवक माजी तालुकाध्यक्ष प्रशांत मोठे यांनी सुरज पाटील यांच्या नेतृत्वखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस मधे प्रवेश केला
या वेळी युवा नेते रोहित देशमुख ,परशूराम सरक , रणजित पाटील आदी युवक कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली
या बैठकीसाठी सरपंच परशूराम सरक ,नितीन डांगे ,किशोर गायकवाड, विशाल जाधव ,दीपक पाटील ,माजी उपसरपंच आशिष जाधव, गणेश आईवळे, आलम कांबळे , अभिजित जवळे, हिम्मत दबडे ,अमित मोरे , अक्षय मोरे, सागर डोईफोडे, राहुल रेड्डी, दत्तात्रय रावळ, सचिन पाटील ,संतोष पाटील, इर्शाद मुलांनी यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
स्वागत गणेश ऐवळे यांनी केले तर आभार किशोर गायकवाड यांनी मानले