
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-
मौजे भाकसखेडा ता.उदगीर येथे आज दि.२ ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या *BRANCH ON WHEEL* व्हॅन द्वारे गावातच घरपोच संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना व सेविंग्स अकाऊंट धारकांना पैसे वाटप करण्यात आले. गावात व्हॅन उपलब्ध करून दिल्याबद्दल बँकेचे चेअरमन आ.धिरजजी देशमुख साहेब, उदगीरचे तहसिलदार रामेश्वर गोरे साहेब, उदगीर तालुका जिल्हा बॅंकेचे फिल्ड ऑफिसर श्री.हणमंत पवार साहेब, श्री.मनोहर केंद्रे साहेब, देवर्जन शाखा चे श्री.शिवराज पात्रे साहेब, इंन्सपेक्टर श्री.अप्पासाहेब मूळे साहेब, सुरेश मामा खटके, गटसचिव संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ बिरादार, वि.का.से.सो. गंगापुरचे चेअरमन विवेक जाधव, सचिव दत्ता सूर्यवंशी यांचे गोरगरीब, वयोवृध्द महिला व पुरुष यांच्या वतीने आभार मानण्यात आले. या प्रसंगी भाकसखेडा गावचे माजी सरपंच प्रकाश जाधव, माजी सरपंच श्रीहरी जाधव, मंडळ अधिकारी पंडित जाधव, धनाजी मोरे, माधवराव टेकपुंजे, दूध सोसायटीचे चेअरमन सुनील जाधव, ग्रामरोजगर प्रतिनिधी लिंबाजी खेडकर, ग्रा.पं सदस्य किरण कांबळे, दत्ता जाधव, दयानंद मोरे, रामभाऊ जाधव, संजय तोबरे, सौदागर जाधव, परमेश्वर मोरे, भवान कांबळे, राम कांबळे, तुकाराम मोरे, अमर कांबळे, अभिषेक जाधव, धनाजी मोरे, माधव जाधव, लक्ष्मण बिरादार, राम मोरे, प्रशांत देवकत्ते, कुमार पाटील, श्याम विश्वनाथ जाधव, गोपाळ जाधव, तुकाराम मोरे, युवक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा बॅंकेचे प्रतिनिधी व वि.का.स.से.सो.चेअरमन विवेक जाधव, व्हा.चेअरमन हंसराज माळेवाडे यांच्या वतीने करण्यात आले होते.