
दैनिक चालु वार्ता वडेपुरी प्रतिनिधि-मारोती कदम
नांदेड जिल्ह्याचे एक कणखर नेतृत्व तथा भाजपा पक्षाचे लोकसभा सदस्य विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचा 2 ऑगस्ट 2022 रोजी 61 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये साजरा करण्यात आला खासदार चिखलीकर साहेब हे नांदेड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असे खासदार आहेत कारण त्यांची कार्यशैली ,निर्णय क्षमता, सर्वसामान्यांसाठी असलेली तळमळ, गोरगरीब माणसांचे प्रश्न सोडवण्याची जिद्द ,ह्यातून त्यांचे गुण दिसून येतात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्याकडे संघटन कौशल्य तर आहेच पण तळागाळातील कार्यकर्त्यांना संघटित करण्याची नेतृत्व क्षमताआहे. प्रतापराव पाटील जेव्हापासून भाजपामध्ये आले तेव्हापासून भाजपा पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये कार्यक्षम बनलेला दिसून आला ,आणि अशा ह्या कणखर नेतृत्वाचा आज 61 वा वाढदिवस संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा होत आहे या प्रसंगी सर्व नांदेड जिल्ह्यातील जनतेने सोशल मीडिया, प्रत्यक्ष भे देऊन अनेक प्रकारचे कार्यक्रम घेवुन,अन्नदान करून ,वृक्षारोपण करून, रक्तदान,वस्त्र दान,शालेय साहित्य वाटप, किर्तन सेवा,असे समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन खासदार चिखलीकर साहेबांचा वाढदिवस मोठ्या आनंदामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये साजरा करण्यात आला. खासदार चिखलीकर साहेबांचे कामाचीच पावती आहे त्यांचे कार्य महान आहे, कोणताही कार्यकर्ता सुखदुःखामध्ये साहेबांना हाक देतो त्यांच्या हाकेला साहेब धावून येतात,असे नेतृत्व म्हणजे खासदार चिखलीकर साहेब आणि अशा हे नेतृत्वाला या लोकनेत्याला वाढदिवस प्रसंगी उदंड आयुष्य मिळावे आणि त्यांच्या हातून जनतेची सेवा घडावी त्यांचे उत्तरोतर अशीच प्रगती व्हावी हीच आज शुभ दिनी सदिच्छा आणि साहेबांचा नांदेड जिल्ह्यातील कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून झालेले आहेत त्यापैकी वाढदिवस प्रसंगी झालेल्या काही मुख्य कार्यक्रमाचे पुढील प्रमाणे नियोजन करण्यात आले होते सर्वप्रथम सकाळी खासदार साहेब भगवानगड येथे दर्शन घेण्यास आले होते मंदिरात महाप्रसाद खासदार साहेबांच्याहस्ते वाटप करण्यात आला.हडको येथील बालाजी मंदिरामध्ये खासदार साहेबांच्या हस्ते आरती संपन्न झाली .दुपारी साईबाबा मंदिर धनगरवाडी येथे साहेबांच्या हस्ते साईबाबांची आरती व गाईंना चारा वाटप व साईबाबांचे अभिषेक खासदार साहेबांच्या हस्ते संपन्न झाला. नंतर संतुकराव हंबर्डे यांच्या आयोजनाखाली तीर्थक्षेत्र काळेश्वर येथे काळेश्वर महादेवांची आरती व महाभिषेक आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन झाले. तसेच सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आनंदराव पाटील शिंदे ढाकणीकर व सिडको येथील संग्राम मोरे यांनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचा सत्कार करण्यात आला .सिडको येथील माधवराव पाटील लोंढे यांच्या घरीही स्वागत स्वीकारण्यासाठी गेले. हडको येथील बालाजी मंदिरामध्ये खासदार साहेबांचे शुभहस्ते आरती संपन्न झाली. शनी मंदिर येथे वेव्हर ब्लॉक रस्त्याचे भूमिपूजन प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या हस्ते संपन्न झाले .हडको येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप खासदार साहेबांच्या हस्ते करण्यात आले तसेच हे सर्व कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या शुभहस्ते वृद्ध वयस्कर मंडळींना वस्त्रदान करण्याच्या आयोजन दिलीप भाऊ कंदकुर्ते महानगर अध्यक्ष यांनी सध्याच्या वृद्धाश्रम मालेगाव रोड नांदेड येथे केले. व वृद्ध मंडळींना कपडे वाटप करण्यात आले. त्यानंतर भक्ती लाॅन्स येथे कार्यक्रम घेण्यात आला .सर्व पाहुणे मंडळींचे स्वागत खासदार साहेब यानी स्वीकारले . भक्ती लाॅन्स या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातून आलेल्या सर्व मंडळींचे सत्कार स्वीकारण्यात आले व खासदार साहेबांनी शुभेच्छांचा स्वीकार केला खरोखरच खासदार चिखलीकर साहेब म्हणजे नांदेड जिल्ह्यातीलच नव्हेत तर मराठवाड्यातील एक कणखर नेतृत्व आहे….