
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी .
संगमनेर तालुक्यांतील राजापूर येथील महिला कीर्तनकार हरिभक्त परायण समाज प्रबोधनकार जयश्रीताई महाराज तिकांडे यांना देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्ताने आंतरराष्ट्रीय युवा महोत्सव संघटनेच्या वतीने राष्ट्रीय युवा पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातून दोनच व्यक्तींची निवड झाली असून यामध्ये हरी भक्त परायण जयश्री ताई तिकांडे यांची निवड झाली आहे या पुरस्काराचे वितरण नवी दिल्ली येथे शनिवार दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब ,अर्थ राज्यमंत्री माननीय नामदार डॉक्टर भागवत जी कराड ,माननीय अमलोक रतन कोहली,माजी राज्यपाल मिझोराम , केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री माननीय नामदार अनुराग ठाकूर, केंद्रीय स्वास्थ्य आणि परिवार कल्याण राज्यमंत्री माननीय फगनसिंग कुलस्थे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ जावेद जमादार ,राष्ट्रीय सचिव डॉ मनीष गवई मा पुनीत प्रधान , उद्योगपती मा, श्री अदित्य सिंघानिया यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे होणार आहे ,,, हरिभक्त परायण जयश्री ताई तिकांडे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.