
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी भूम पोलिसांकडून नागरिकात जनजागृती करण्यात येत आहे.
सध्या देशात मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन आर्थिक फसवणुक वाढली असुन त्या अनुषंगाने लोकांचे आर्थिक नुकसान व फसवणूक होऊ नये म्हणून भूम् पोलीस ठाणे हद्दीतील बस स्टँड ,रिक्षा स्टँड ,हॉटेल्स ,मेन चौक , गोलाई चौक,गांधी चौक, ओंकार चौक,इत्यादी ठिकाणी जनजागृती करण्यात आली. त्यावेळी ऑनलाईन फसवणुक बदले फोन पे, गूगल पे, paytam, क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड, ऑनलाईन लॉटरी, ॲप लोन , सोशल मीडिया फ्रोड, हनी ट्रॅप, सेक्सटॉर्षन,इत्यादी विषयांवर नागरिकांत जनजागृती करण्यात आली. ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी भुम पोलीस ठाणे कडून सदरची माहिती आपल्या मित्र , नातेवाईकांना, अभियान शाळा, कॉलेज, सरकारी कार्यायांमध्ये, ग्रामपंचायत, गर्दी च्या ठिकाणी सतत चालू राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी सांगितले.
तसेच सायबर क्राईम (ऑनलाईन फ्रोड)बाबत काही तक्रार असल्यास तत्काळ पोलिस स्टेशन शी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सदरची सायबर क्राईम जनजागृति एसडीपोओ भूम श्री डांबाळे, पीआय श्री सुरवसे यांच्या मार्गर्शनाखाली एपीआय साळवे, पीएसआय जूनेडी,पोलीस अमलदार पोना खोत, पोना बिबी जाधवर,पीसी विठ्ठल मलंगनेर यांनी केली.