
दैनिक चालू वार्ता अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी- बालाजी देशमुख
अंबाजोगाई-: नवीन उद्योग कसा सुरू करावा? अर्थसहाय्य कसे उपलब्ध होते. निर्माण होणाऱ्या उत्पादनास बाजारपेठ कशी उपलब्ध होते.आहे या व्यवसायांना सवलतीच्या दरात कर्जपुरवठा कसा उपलब्ध होतो?अशा अनेक प्रश्न व समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी अहमदाबाद येथील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्योगविषयक मार्गदर्शक निरंजन जुवा(जैन) यांच्या उपस्थितीत अंबाजोगाई येथे ५ ऑगस्ट शुक्रवारी नगरपरिषदेच्या आद्यकवी मुकुंदराज सभागृहात सायंकाळी सहा वाजता उद्योग मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन भारतीय जैन संघटना, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या फार्मसी कॉलेज च्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या एम.एस.एम.ई.जिल्हा उद्योग केंद्र,बीड.यांचाही समावेश या कार्यशाळेत होणार आहे. या कार्यशाळेत सुशिक्षित बेरोजगारांना नवीन उद्योग, व्यवसाय सुरू करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. व्यवसाय सुरू करताना लागणारे आर्थिक भांडवल शासनाच्या व बँकांच्या माध्यमातून कसे उपलब्ध होते.यासाठी कोणकोणत्या योजना कार्यरत आहेत. आहे या व्यवसायाला गतिमान करण्यासाठी शासनाच्या कोणत्या योजना कोणत्या सवलती उपलब्ध आहेत.तयार उत्पादन शासन कसे खरेदी करते?बाजारपेठेत कशी उपलब्ध होते.महिलांना करता येणारे घरगुती उद्योग व व्यवसाय या सर्व विषयांवर अहमदाबाद येथील उद्योग विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय तज्ञ मार्गदर्शक निरंजन जुवा हे कार्यशाळेस मौलिक मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेस भारतीय जैन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हस्तीमलजी बंब,भारतीय जैन संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष धनराज सोळंकी उपस्थित राहणार आहेत. अंबाजोगाई व परिसरातील सुशिक्षित बेरोजगार, नवीन व्यवसायिक,व्यापारी यांना ही सर्व अद्यावत माहिती व शासकीय योजना माहीत व्हाव्यात या उद्देशाने भारतीय जैन संघटना, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी,बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या फार्मसी कॉलेज च्या वतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचा लाभ घ्यावा. असे आवाहन अंबाजोगाई भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष निलेश मुथा, सचिव अधिकार मर्लेचा,रोटरी चे अध्यक्ष मोईन शेख,सचिव भीमाशंकर शिंदे,बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत मोदी यांनी केले आहे.