
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
पेठवडज:- बारुळ ते पेठवडज या रोडवर बारूळ पासून एक किलोमीटर अंतरावर पुलाचे बांधकाम चालू असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता व पुल उपलब्ध करून देण्यात आला होता.परंतु ढगफुटी व संततधार चालू असलेल्या पावसामुळे हा पर्यायी रस्त्यावरील पुल वाहून गेला आहे.त्यामुळे नांदेड ते पेठवडज गाडी बंद झाली आहे.पुल वाहुन गेल्याने वरवंट व रहाटी येथील शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून;इतरही रहदारी बंद झाली आहे.त्यामुळे बारुळ ते पेठवडज हा रस्ता व पुल लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.