
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
विटा.
सांगली जिल्हा परिषद मध्ये महिला व बालकल्याण सभापती म्हणून कार्यरत असताना आदरणीय काकींना भेटण्याचा अनेकदा योग आला शांत, प्रसन्न, सुशील चेहऱ्यावरती आमदार पत्नीचा कसलाच आविर्भाव नाही काकी यांच्या घर संसार शेती, मातीत रमल्या जाणवायच्या पण त्यांचे अस्तित्व परिसरांत भरगच्च वाटायचे त्या शेती, द्राक्ष बाग घर मुलं नातवंडे यावर भरभरुन बोलायच्या भाऊंच्या बरोबरीने बाहेरच्या कामकाजांत त्या फारशा दिसल्या नाहीत पण खऱ्या अर्थाने कर्तुत्वान पुरुषांची सावली बनून त्या नेहमीच खंबीरपणे भाऊंना साथ देत राहिल्या.शोभाताई अनिल बाबर ( वय ६२) यांचे बुधवारी सकाळी साडेदहा वाजता पुणे येथे खाजगी रुग्णालयांत निधंन झाले. गेले काही दिवसांपासून शोभाताई बाबर यांना फुफ्फुसांचा त्रास सुरु होता दोन दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढउतार होत होता बुधवारी सकाळी उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मावळली दि. २७ नोव्हेंबर १९६० रोजी जन्मलेल्या शोभाताई (आर्वी ता. कोरेगाव जि. सातारा) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जाधव पाटील यांच्या त्या कन्या होत्या. त्यांच्या जाण्यांमुळे सांगलीसह उत्तर कोरेगांव तालुक्यांमध्ये शोककळा पसरली. शोभा बाबर या (काकी ) या नावांने त्या परिचित होत्या. खरंच शोभाताई या बाबर कुटुंबाची शोभा होत्या त्यांच्या पश्चांत पती आ. बाबर, माजी नगरसेवक अमोल आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास ही दोन मुले सुना दीर, जाऊ, नातवंडे असा त्यांचा परिवार होता. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि या अतीव दुःखांतून बाबर कुटुंबियांना सावरण्यांचे बळ देवा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.