
दैनिक चालु वार्ता अहमदपूर प्रतिनिधी-
अहमदपूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय माजी आमदार बब्रूवानजी खंदाडे यांना नूकताच जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि चलो बुद्ध की ओर अंतर्गत व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळा नूकताच वाराणसी सारनाथ येथे आयोजित करण्यात आला होता.
वाराणसी सारनाथ येथे आयोजित केलेल्या या शानदार सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय उच्च तिब्बती शिक्षण संस्थेचे कुलपती डॉ.गेशे डवड समतेनजी हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमारजी,उत्तर प्रदेश कार्यवाह
डॉ.वीरेंद्र जयस्वाल आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
माजी आमदार बब्रूवानजी खंदाडे यांनी सताळा ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच म्हणून कार्य केले आहे तदनंतर लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही पाच वर्षे काम केले असून अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून येऊन अहमदपूर व चाकुर तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे.माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक, धार्मिक,राजकीय,सांस्कृतिक, क्रिडा, सहकार अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एम्स आयडॉल- जीवनगौरव’ हा अत्यंत महत्त्वाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांना देवून गौरविण्यात आले आहे.
सदरील पुरस्कार मिळाल्यानेअहमदपूर व चाकुर तालुक्यासह संबंध लातूर जिल्ह्यातून माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.