
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
चंद्रपूर
चंद्रपूर तुकुम स्थानिक निर्माण नगर येथील ज्येष्ठ नागरिक भवन या ठिकाणी बाळकृष्णजी महाराज आयुर्वेदाचार्य यांचा जन्मदिवस जडीबुटी दिवस म्हणून आज गुरूवार दि.४ऑगस्टला सकाळी 06.00 ते ,07.30 पर्यंत साजरा करण्यात आला . तदवतंच येथील योगा क्लासचा देखील पाचवा वर्धापन दिन आनंदी व उत्साही वातावरणात केक कापून थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बबनराव धर्मपूरीवार यांनी विभुषित केले होते तर प्रमुख अतिथी म्हणून विजयजी चंदावार. शरद व्यास व सुभाष कासनगोटूवार प्रामुख्याने उपस्थित होते. आरंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पाहुण्यांचा स्वागत कार्यक्रम पार पडला या वेळी संगीतमय स्वागत गीत महिला क्लासच्या सर्व सदस्यांनी गायीले . सर्व पाहुणे मंडळींनी
वृक्षारोपण करून या भागात जडीबुटी दिवस उत्सव आनंदात साजरा केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णा लोखंडे यांनी केले. पाहुण्यांनी जडीबुटी दिन तसेच योगा क्लासच्या वर्धापन दिनानिमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन रमेशजी ददगाल यांनी केले तर आभार प्रदर्शन रामेश्वरजी खोडे यांनी केले. स्थानिक तुकुम चौक, शहीद चौक या ठिकानी लॉ कॉलेज योगा क्लासच्या वतीने जडीबुटी वाटण्यात आली.येथे प्रमुख पाहुणे डॉ. गोपालजी मुंधडा होते.या ठिकाणी योग शिक्षिका वैजयंती गहुकर यांचे संगीता वर योगिग जॉगिंग नृत्य झाले. कार्यक्रमानंतर लॉ कॉलेज व लॉ कॉलेज योगा क्लासच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला त्यानंतर कॉलेजच्या हॉलमध्ये सुभाष कासनगोटुवार यांच्या वतीने सर्वांना फराळ देण्यात आला.