
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
राजूरा
राजुरा तालुक्यातील देवाडा येथे दोघांचा ग्रॅस्टोने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, या गावातील अनेक रुग्ण चंद्रपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेली माहिती समोर येत आहे.दूषित पाण्यामुळे गॅस्टो लागवड झाल्याने सांगितले जात आहे ,लक्ष्मी मारकसवार व अनिसा शेख यांचा मागील तीन दिवसात मृत्यू झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले .गावात दूषित पाण्यामुळे गेल्या तीन दिवसात दोन महिलांसह डोमा वारलू शेंडे वय 55 यांचा मृत्यू झाल्याने सांगितले जात आहे. गावातील काही रुग्ण चंद्रपूर खाजगी उपचार घेत आहेत
प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यानंतर उपचार न करता जिल्हा आरोग्य उपकेंद्र राजुरा येथे रेफर केले जात असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये रोष व्यक्त होत आहे ,दरम्यान उपजिल्हा रुग्णालयातही उपचार होत नसल्याने त्यांनां चंद्रपूर येते पाठविण्यात येते. साथ आजाराची झपाट्याने वाढ होत असल्याने राजुरा तालुक्यात मोठी खळबळ झाली आहे.