
दैनिक चालु वार्ता आटपाडी प्रतिनिधी-दादासो वाक्षे
३ वर्षे प्रलंबित शेतकरी व पशुपालकांना न्याय : पशुपालकांकडुन मेंढपाळ आर्मी चे आभार
आटपाडीतील वन्यपशुंच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेळ्या-मेंढ्यांचे अडीच लक्ष रूपये इतके अनुदान बुधवारी वनक्षेत्रपाल ए.एस.खाडे मेंढपाळ आर्मी चे प्रभाकर पुजारी, कार्याध्यक्ष अंकुश मुढे, आण्णा सरगर, सुरेश दिवटे,चंदु हाके यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
मेंढपाळ आर्मीच्या माध्यमातून कार्याध्यक्ष अंकुश मुढे,तालुकाध्यक्ष दत्तात्रय काळे, विनायक शेंडगे, बाळासाहेब माने, संतोष माने नवनाथ साळुंखे यांनी गेल्या वर्षापासून वन्यपशुंच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेळ्या-मेंढ्यांचे अनुदान वाटप करण्यात यावे याकरिता लढा दिला होता.
वनक्षेत्रपाल श्री खाडे यांनी तातडीने दखल घेत सदर प्रस्तावास मंजुरी मिळण्यास प्रयत्न केले होते त्याबद्दल त्यांचा मेंढपाळ आर्मी च्या वतीने सत्कार करून यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना मेंढपाळ आर्मी चे कार्याध्यक्ष अंकुश मुढे म्हणाले आटपाडी तालुक्यात वनक्षेत्रपाल सुप्रिया शिरगांवे यांच्या कार्यकाळात एकाही मेंढपाळाला मदत मिळाली नाही मेंढपाळांचे ३८ प्रस्ताव धुळखात पडले होते. त्यांच्या कार्यावर नाराजी व्यक्त करत,आम्ही जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे दप्तर दिरंगाई ची मागणी केली होती. यानंतर त्यांनी बदली करून घेतली. दि.२आॅगस्ट रोजी ३८ प्रस्ताव आटपाडीचे नुतुन वनक्षेत्रपाल मा ए.एस. खाडे यांनी मंजूर केले. त्यांचे मेंढपाळ आर्मी च्या वतीने कौतुक व अभिनंदन करतो. यावेळी मेंढपाळ व पशुपालकांनी मेंढपाळ आर्मी चे आभार मानले
मेंढपाळ व पशूपालक आपली जनावरं जिवापाड जपतात, काळाचा घाला होतो आणि हिंसक पशुंचा शेळ्या मेंढ्या वर हल्ला होतो यातुन पशुपालक शेतकरी कोलमोडतो यातुन धीर देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे परंतु ती राबविताना प्रशासनातील अधिकारी कुचकामी भुमिका घेत आहेत असे मत कार्याध्यक्ष अंकुश मुढे यांनी व्यक्त केले. पुढे म्हणाले ए. एस खाडे साहेब यांच्यासारखे पशुपालकांना न्याय देणारे अधिकारी खुप असतात असेही ते बोलताना म्हणाले….